BJP Meeting News : भाजपची उद्या बैठक, मंत्रिमंडळ विस्तारात नागपूर जिल्ह्यातून `या' नावाची चर्चा !

Nagpur : नागपूर जिल्ह्यातून कोणाचा नंबर लागेल याची चर्चा सुरू झाली आहे.
Chandrashekhar Bawankule, Sameer Meghe and Devendra Fadanvis.
Chandrashekhar Bawankule, Sameer Meghe and Devendra Fadanvis.Sarkarnama
Published on
Updated on

Sameer Meghe is seen as a strong face : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर रविवारी (ता. २) त्यांच्यासोबत आलेल्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (BJP is stronger in the city compared to rural Nagpur)

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे जाहीर केले असल्याने पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यातून कोणाचा नंबर लागेल याची चर्चा सुरू झाली आहे. सातत्याने निवडून येणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्यापैकी एकाचा मंत्रिमंडळात नंबर लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर ग्रामीणच्या तुलनेत शहरात भाजप ताकदवर आहे. ग्रामीणमध्ये पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने आश्‍वासक चेहऱ्याला मंत्रिमंडळात घेण्याचा विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही माहिती खरी ठरल्यास हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

नागपूर ग्रामीणमधील भाजपचा सशक्त चेहरा म्हणून भाजप आमदार समीर मेघे यांच्याकडे बघितले जाते. भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत नागपूर ग्रामीणमध्ये मंत्रिपद दिल्यास पक्ष मजबूत होणार आहे.

Chandrashekhar Bawankule, Sameer Meghe and Devendra Fadanvis.
Bawankule On Sharad Pawar: परिवारातले लोक सोडून जात आहेत, आता शरद पवारांनी आपलं घर सांभाळावं !

नागपूर ग्रामीणच्या तुलनेत शहरात भाजप ताकदवर आहे. ग्रामीणमध्ये पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने आश्‍वासक चेहऱ्याला मंत्रिमंडळात घेण्याचा विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही माहिती खरी ठरल्यास हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

नागपूर ग्रामीणमधील भाजपचा सशक्त चेहरा म्हणून भाजप आमदार समीर मेघे यांच्याकडे बघितले जाते. भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत नागपूर ग्रामीणमध्ये मंत्रिपद दिल्यास पक्ष मजबूत होणार आहे.

Chandrashekhar Bawankule, Sameer Meghe and Devendra Fadanvis.
Fadanvis On Cabinet Politics: 'माझी इच्छा महाराष्ट्रातच काम करण्याची; पण वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल...'

हिंगणा विधानसभा क्षेत्रात जेव्हा पहिली निवडणूक लढवली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा पराभव केला. दुसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय घोडमारे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले होते. या निवडणुकीतही समीर मेघेंनी भरघोस मतांनी विजय संपादन केला.

सुरुवातीलाच त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. मात्र शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीची हात मिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांचे मंत्रिपद हुकले. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली. यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघातील विकास कामांना स्थगिती दिली होती.

Chandrashekhar Bawankule, Sameer Meghe and Devendra Fadanvis.
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे म्हणाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते म्हणून...

या विरोधात हिंगणा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा हिंगणा शिवाजी चौकात मोर्चा दरम्यान जाळण्यात आला. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पहिला पुतळा हिंगणा येथे जाळण्यात आला. या आंदोलनाला राज्यभर प्रसिद्धी मिळाली. विपरीत परिस्थितीत मतदार संघातील विकास कामाकरिता त्यांनी निधी आणण्यासाठी बरीच कसरत केली.

आमदार समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे ‘रिपोर्ट कार्ड' उत्तम असल्याचे भाजपच्या सर्वेतून समोर आले आहे. ग्रामीण भागात भाजपची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची सर्वच नेत्यांसोबत जवळीक आहे. त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांचे पुत्र समीर मेघे यांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन त्यांचा सन्मान केला जाऊ शकतो.

Chandrashekhar Bawankule, Sameer Meghe and Devendra Fadanvis.
Nagpur District BJP : दटके नागपूर, तर गजभिये रामटेकचे निवडणूक प्रभारी, नवे जिल्हाध्यक्ष कोण?

भाजपने (BJP) राज्यातील आमदारांची महत्त्वाची बैठक उद्या सात जुलै रोजी मुंबई येथे होत आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत आमदारांशी वरिष्ठ नेत्यांची चर्चा होणार असून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी समीर मेघे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का, याची उत्सुकता हिंगण्‍याच्या जनतेमध्ये बघायला मिळत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com