NCP Ajit Pawar Group Sarkarnama
मुंबई

NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादीचा अजित पवार गट टाकणार 'टाॅप गिअर' ; जिल्हाध्यक्षांना मिळणार 'हे' मोठं गिफ्ट

Political News : आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मोठी घोषणा केली आहे...

Deepak Kulkarni

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार हे दोन्हीही नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी राज्याचा झंझावाती दौरा करत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीला भरभक्कम करतानाच महायुती विरोधात रान पेटवण्याचं काम सुरू केले आहे.

याचवेळी अजित पवारांनी शरद पवार (Ajit Pawar) गटातील विद्यमान आमदारांसह खासदारांना घेरायला सुरुवात केली आहे. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मोठी घोषणा केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा उत्साह संचारणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटातील प्रतेक जिल्हाध्यक्ष यांना आपल्या प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्याकरिता आणि फिरण्याकरिता पक्षाकडून चारचाकी वाहन देण्यात येणार आहेत अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. आता ती घोषणा प्रत्यक्षात येणार आहे. अजित पवार हे दिलेल्या शब्द पाळण्यासाठी पक्के म्हणून ओळखले जातात.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील वाद सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. यावरील निवडणूक आयोगातील सुनावणीही अंतिम टप्प्यात आली आहे.याचवेळी अजित पवारांनी मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.आणि लवकरच अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असल्याचीही माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाकडून तब्बल 40 हून अधिक गाड्या घेण्यात येणार आहेत. या गाड्या महिद्रा कंपनीच्या असणार आहेत घेण्यात येणार आहेत.टेस्ट ड्राईव्हसाठी या महिंद्रा कंपनीच्या गाड्या पक्षाच्या कार्यालयात आणण्यात आल्या आहेत.

राज्यात गेल्यावर्षी जूनमध्ये सत्तापालट झाला. राष्ट्रवादी असलेल्या आघाडीची सत्ता जाऊन पुन्हा भाजप आणि शिंदे शिवसेना सत्तेत आली.त्यानंतर गेले वर्षभर मावळातील विकासकामांना ब्रेक लागला होता. मंजूर झालेल्या कामांचा निधीही रखडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT