Mumbai News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित आहेत. यामुळे ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटला आहे (Marathi Latesat News)
नुकतंच ठाकरे गटाच्या विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची साथ सोडली होती. आज नीलम गोऱ्हे यांचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणे, हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का आहे. (Neelam Gorha joined Eknath Shinde's Shiv Sena)
नीलम गोऱ्हे यांची ओळख फक्त विधान परिषदेवरील आमदार नाही, त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष त्यांनी माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली. (Neelam Gorhe News Eknath Shinde Shivsena)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.