Neelam Gorhe News: ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? उपसभापती नीलम गोऱ्हे जाणार शिंदेंच्या शिवसेनेत?

Neelam Gorhe Join Eknath Shinde Shivsena : शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या नीलम गोऱ्हेंची ओळख..
Neelam Gorhe News :
Neelam Gorhe News :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित आहेत. यामुळे ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटला असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Neelam Gorhe News :
Rahul Gandhi Gujrat High Court: राहुल गांधींना पुन्हा झटका; 'ती' याचिका फेटाळली

नुकतंच ठाकरे गटाच्या विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची साथ सोडली होती. आज नीलम गोऱ्हे यांचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणे, हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का आहे.

Neelam Gorhe News :
Sadabhau Khot News: भाजपच्या घटक पक्षांच्या अपेक्षांवर पाणी फिरले!

नीलम गोऱ्हे यांची ओळख फक्त विधान परिषदेवरील आमदार नाही, त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत नीलम गोऱ्हे यांनी १९९८ साली  शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष त्यांनी माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com