Vikas Thakre News : नवीन आयुक्त चर्चेसाठी न आल्याने कॉंग्रेस आक्रमक, मडकी फोडली...

Nagpur : आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून पाण्याची मडकी फोडली.
Vikas Thakre and Other Congress Leaders.
Vikas Thakre and Other Congress Leaders.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress workers became aggressive at Municipal Corporation : नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने महापालिकेच्या मुख्यालयावर धडक देण्यात आली. नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसल्याचा आरोप करून काँग्रेसने नवनियुक्त महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना एकप्रकारे इशारा दिला. (Abhijit Chaudhary was given a kind of warning)

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काल (ता. ६) सुमारे तीनशे ते चारशे कार्यकर्ते हातात फलक घेऊन मुख्यालयात धडकले. आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून पाण्याची मडकी फोडली. मनपा आयुक्तांना चर्चेला येत नसल्याचे बघून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रांत शासनाच्या अमृत योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्याकरिता रस्ते खोदण्यात आले. मात्र त्याचा मलबा रस्त्याच्या कडेला टाकला आहे. घनकचरा उचलणारी एजंसी नियमित कचरा उचलत नाही.

ओसीडब्ल्यू जलप्रदाय विभागामार्फत सर्व वस्त्यांना समान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही. महापालिकेने मालमत्ता कर, पाणी पट्टीत मोठी वाढ केली आहे. सुविधा मात्र काहीच दिल्या जात नसल्याचा आरोप काँग्रेसचा आहे.

Vikas Thakre and Other Congress Leaders.
Vikas Thakre News : कोराडी प्रकल्पावरून कॉंग्रेस-भाजप आमने-सामने, आमदार ठाकरे संतापले !

नागपूर शहराला २४ बाय सात पाणी पुरवठा करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांनी सातत्याने केल्या. पण २४ बाय सात तर सोडा एक तासही पाणी नळाला येत नाही. पाणी पुरवठ्याच्या नावावर केवळ रस्ते खोदण्याचे काम महानगरपालिकेने केले. त्याचा मलबा अजूनही तसाच पडून आहे.

मलबा उचलून रस्ता मोकळा करण्याचेही सौजन्य महानगरपालिकेने (Municipal Corporation) दाखवले नाही. भरमसाठ कर घेऊनही महापालिका सुविधा देण्याच्या नावावर शून्य आहे, असा आरोप नागपूर (Nagpur) शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी केला.

Vikas Thakre and Other Congress Leaders.
Vijay Wadettiwar News : आज आम्हाला आमदार म्हणवून घ्यायला लाज वाटते !

आंदोलनात आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, मिलिंद दुपारे, रमण पैगवार, संजय सरायकर, विवेक निकोसे, स्नेहा निकोसे, डॉ. सुधीर आघव, ब्लॉक अध्यक्ष राजेश पौनीकर, युवराज वैद्य, ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाल पट्ट्म, अब्दुल शकील, मोतीराम मोहाडीकर, पंकज निघोट, पंकज थोरात, सुरज आवळे, ईरशाद मलिक, देवेंद्र रोटेले, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, महेश श्रीवास, वंदना मेश्राम, रिना चव्हाण,अतिक कुरेशी, उमेश शाहू, मनीष चांदेकर, लीलाधर लिल्लारे, सुनील दहीकर, कुमार बावनकर, सुनिल दहीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com