Aryan Khan Case Update :  Sarkarnama
मुंबई

Aryan Khan Case : वानखेडे प्रकरणात नवा ट्विस्ट, शाहरूख खानला आरोपी करा; कुणी केली याचिका दाखल?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : आर्यन खान क्रूज ड्रग्स प्रकरणाला (Aryan Khan Case) आता वेगळे वळण आहे. या प्रकरणी आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी ही याचिका दाखल केली आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणात शाहरुख खान यांनाही आरोपी करा, अशा मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. (Wankhede case accuse Shah Rukh Khan Petition filed by Adv Nilesh Ojha)

शाहरूख खानवर दाखल याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणात तत्कालीन मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यांनतर आता या प्रकरणात शाहरूख खान यांनाही आरोपी करण्याची मागणी दाखल याचिकेतून करण्यात आली आहे.

दाखल एफआयआरमध्ये शाहरूख खान याने ५० लाख रूपयांची लाच देवू केल्याचे प्रयत्न केले होते , असे नमूद आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार, लाच मागणे आणि लाच देणे हे दोन्हीही कृत्ये दोषी मानले जातात. शाहरुख खान याने लाच दिली आहे, त्यामुळे शाहरूख खान यांनाही आरोपी करावं, अशी याचिकाकर्ते यांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT