Nilesh chavan .jpg Sarkarnama
मुंबई

Nilesh Chavan: मोठी बातमी: निलेश चव्हाणनं लपवली धक्कादायक माहिती; पिस्तुल परवान्याची सतेज पाटलांनीच काढली ऑर्डर

Pune Nilesh Chavan Crime : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाचे एकापाठोपाठ एक प्रकरणं समोर येऊ लागली आहे. यातच काही दिवसांपूर्वी बंदुक मिळवण्यासाठी हगवणेंनी वास्तव्याचा खोटा पत्ता दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण याच्या पिस्तुल परवान्याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली होती.

Deepak Kulkarni

Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नेपाळमधून अटक करण्यात आलेल्या आरोपी नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान,चव्हाणच्या पिस्तुल परवान्याबाबत खळबळजनक माहिती समोर येत आहे.

गृह विभागाकडे झालेल्या सुनावणीदरम्यान, त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांपासून लपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी आधी नाकारलेला अर्ज मंत्र्यांच्या सुनावणीनंतर मंजूर झाला आणि चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला.

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी सासरचं संपूर्ण हगवणे कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. त्यानंतर हगवणे कुटुंबाचे एकापाठोपाठ एक प्रकरणं समोर येऊ लागली आहे. यातच काही दिवसांपूर्वी बंदुक मिळवण्यासाठी हगवणेंनी वास्तव्याचा खोटा पत्ता दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण Nilesh Chavan याच्या पिस्तुल परवान्याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली होती.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अटकेत असलेल्या निलेश चव्हाणने पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता.मात्र,पोलिसांकडून त्याचा हा अर्ज सुरक्षेचं कारण पुढे करत फेटाळला गेला होता. यानंतर चव्हाणनं गृह विभागात अपील केले होते.यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील Satej Patil यांच्यासमोर पिस्तुल परवान्यासाठी सुनावणी पार पडली आणि चव्हाणला संबंधित परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे निलेश चव्हाणला पिस्तुल परवाना देण्यासाठी सरकार दरबारी घडामोडींना वेग आला असतानाच वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्कार व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती गृह विभागाला देणे आवश्यक असतानाही पुणे पोलिसांनी ती दडवली आणि परवाना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. माहिती दिली असती,तर कदाचित हा पिस्तुल परवाना रद्दही करण्यात आला असता.

तसेच निलेश चव्हाणबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर यते आहे.त्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांशी असलेलं कनेक्शनही वापरल्याची चर्चा आहे. मात्र, चव्हाणला गृह विभागाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी चव्हाणला परवाना मंजूर केल्याचं आता समोर आलेलं आहे.त्यामुळे चव्हाणच्या पिस्तुल परवान्याबाबत पोलिस आणि प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT