Laxman Hake: हाकेंच्या अडचणी वाढणार; गिफ्ट मिळालेल्या फॉर्च्युनर गाडीची चर्चा अन् ड्रायव्हर म्हणतो; पगार बुडवला,पत्नीला...

OBC Leader Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिलेल्या आलिशान फॉर्च्युनर लेजेंडर कारची चर्चा सुरू असतानाच आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं,या मागणीसाठी लढा उभारला होता. याच मागणीला कडवा विरोध करत लक्ष्मण हाकेंनी आंदोलनाचं शस्त्र उपसत जरांगे पाटलांना लक्ष्य केलं होतं. अशातच परभणी तालुक्यातील राणीसावरगावच्या ओबीसी नेत्यांनी हाकेंना महागडी अशी फॉर्च्युनर लेजेंडर ही महागडी कार भेट म्हणून दिली होती. मात्र,आता याच हाकेंवर त्यांच्या ड्रायव्हरनं गंभीर आरोप केले आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिलेल्या आलिशान फॉर्च्युनर लेजेंडर कारची चर्चा सुरू असतानाच आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लक्ष्मण हाकेंच्या पूर्वीच्या ड्रायव्हरनेच त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ओबीसी (OBC) समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावरील गाडीवर ड्रायव्हर राहिलेल्या सचिन बंडगर यांनी त्यांचा दोन वर्षांचा पगार बुडवल्याचा आणि पत्नीला नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याचं गंभीर आरोप केले आहेत. बंडगर म्हणाले,गेल्या पाच वर्षांपासून हाकेंकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. ते ओबीसी समाजाचं काम करत असल्यानं मागच्या तीन वर्षांपासून त्यांना पगार मागितला नसल्याची माहिती त्यांनी दिली

पण काम सोडत असताना मी तुला पगार देतो काही घरच्या अडचणी आहेत असं म्हणून हाके यांनी आपल्याला वापरून घेतले. याचवेळी त्यांनी पत्नीला नोकरीला लावतो म्हणतही फसवणूक केल्याचा खळबळजनक दावाही हाकेंचे पूर्वीचे ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी केला आहे.

Laxman Hake
Caste-Based Census : जनगणनेबाबत मोठी बातमी; तारखा आल्या समोर, दोन टप्पे झाले निश्चित

ड्रायव्हर सचिन बंडगर याच्या या आरोपांवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. ते म्हणाले,सचिन बंडगर आपला कार्यकर्ता असून जर त्याचा पगार दिला नसेल तर त्याच्या गावातील शेजारची माणसं तो नेऊन देतील असं म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी विरोधकांना तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकाऊ नका. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या पिलावळ्यांकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसूनच म्हणूनच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं.याचदरम्यान, आपण ओबीसींच्या निधीबद्दलचे प्रश्न उपस्थित करत असून आधी त्याचे उत्तर द्या असं आव्हानही केलं आहे.

Laxman Hake
Nashik Politics : बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध... सीमा हिरे पदर खोचून मैदानात; धू-धू धुतलं, गुन्ह्यांची कुंडलीच काढली!

तसेच यापुढेही आपण बोलायचं आणि गावगाड्यात फिरायचं थांबवणार नसल्याचं ठणकावून सांगितलं. त्यांनी आपल्याला महाराष्ट्रात फिरू न देण्याची धमकी दिली असली तरी माझं फिरणं काही थांबलेलं नसून ते सुरूच असल्याचंही हाके यांनी सांगितलं.

ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत परभणीत मंगळवारी (ता.27 मे) आंदोलक लक्ष्मण हाके यांना थेट फॉर्च्युनर ही आलिशान गाडीच गिफ्ट केली होती. या गिफ्टची मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे.परभणी तालुक्यातील राणीसावरगाव येथील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी हाकेंना महागडी अशी फॉर्च्यूनर लेजेंडर कार भेट म्हणून दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Laxman Hake
NCP Sharad Pawar : 'आघाडी होवो अथवा ना हो, तयारीला लागा'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नेमले निरीक्षक

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठा लढा उभारला होता. या त्यांच्या लढ्याची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दखल घेतली गेली. पण त्यांच्या याचवेळी जरांगेंनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करतानाच राजयात नवा संघर्ष पेटला. ओबीसी समाजातील नेत्यांकडून जरांगेंच्या या मागणीविरोधात मोठं आंदोलन उभं केलं. त्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत ओबीसी समाजातलं नेतृत्व पुढं आणलं.आता याच हाकेंना ओबीसी समाजाकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com