Jitendra Awhad-Nilesh Rane Sarkarnama
मुंबई

Nilesh Rane : विधानसभेत ‘त्या’ मंत्र्यांच्या मदतीला धावले नीलेश राणे; आव्हाडांना सुनावत म्हणाले, ‘आव्हाडसाहेब तुम्ही राजापूरचे नाहीत...’

Maharashtra Budget Session : संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथ घेता ना. पण एक मंत्री उठतात, बाहेर जातात आणि आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री आणि कॅबिनेट काहीच बोलत नाही. कधी औरंजेबावरून आग लागते, तर कधी हलाल की झटका...

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 March : विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजापूरमधील दर्गा जाळपोळ घटनेचा उल्लेख केला. त्यासंदर्भाने बोलताना ‘एक कॅबिनेट मंत्री उठतात, बाहेर जातात आणि आग लावण्याचा प्रयत्न करतात,’ असा उल्लेख केला. त्या विधानावर आक्षेप घेत आमदार नीलेश राणे हे त्या मंत्र्यांच्या मदतीला धावले आणि ‘राजापूरच्या घटनेशी त्या मंत्र्यांचा काय संबंध होता. त्यांच्याकडे काय पुरावा आहे का, हे आव्हाडांनी सांगावे. आव्हाडसाहेब तुम्हाला माहिती नाही... असेही सुनावले.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. ते म्हणाले ज्या राजापूरमधून बॅरिस्टर नाथ पै आले, ज्या राजापूरमधून मधु दंडवते आले. ज्या राजापूरने यापूर्वी कधीही हिंदू- मुसलमान वाद बघितला नाही. त्याच राजापूरमध्ये चार जण जाऊन दर्गा जाळतात. दर्गा जळत होता. मुस्लमान घाबरलेले होते. कोणीही जवळ जायला तयार नव्हतं. अखेर गावातील सगळे हिंदू बाहेर आले, ते दर्ग्याजवळ गेले आणि त्या सर्वांनी ती आग आटोक्यात आणली. हे मला अभिमानानं सांगावसं वाटतयं. ही हिंदूंची ओळख आहे.

वसुधैव कुटुंबकम म्हणणारे आम्ही हिंदू आहोत. परंपरा पाळणारे आम्ही हिंदू आहोत. बंद करा हे सर्व, महाराष्ट्र जाळू नका. महाराष्ट्राला जाळून राख करून टाकाल. तुमच्यातील एक मंत्री. कॅबिनेट म्हणजे सामूहीक जबाबदारी असते ना. का ही जबाबदारी फक्त तुमच्या लोकांपुरती मार्यदित असते. मला विखे साहेबांकडून (Vikhe Patil) ती जाणून घ्यायची आहे. कॅबिनेट मंत्र्यांची जबाबदारी ही फक्त कॅबिनेटपुरती मर्यादित असते की बाहेरही गेल्यावर त्यांची तीच जबाबदारी असते. मग शपथ कशाला घेता? असा सवाल आव्हाड यांनी केला.

ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथ घेता ना. पण एक मंत्री उठतात, बाहेर जातात आणि आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री आणि कॅबिनेट काहीच बोलत नाही. कधी औरंजेबावरून आग लागते, तर कधी हलाल की झटका...

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर आमदार नीलेश राणे यांनी आक्षेप घेतला. पण, मी कोणाचंच नाव घेतलं नाही, असा बचाव आव्हाडांनी करण्याचा प्रयत्न केला. पण, राणेंना अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, एक मंत्री बाहेर गेले आणि आग लावली, याचा काय अर्थ होतो, हे आव्हाड यांनी सभागृहाला सांगावं.

राजापूरच्या घटनेशी त्या मंत्र्यांचा काय संबंध होता. त्यांच्याकडे काय पुरावा आहे का, हेही आव्हाड साहेबांनी सभागृहाला सांगावं. राजापूरमध्ये नेमकं काय घडलं. आव्हाडसाहेब तुम्ही राजापूरचे नाहीत, तुम्हाला माहिती नाही. परिस्थिती पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती. ‘आऊट ऑफ कंट्रोल’ नव्हती. तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करता, त्यांसदर्भात तुमच्याकडे कसला पुरावा आहे का. हे आव्हाडांनी सभागृहाला सांगावं

नीलेश राणेंच्या आरोपावर जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाचे नियम मलाही माहिती आहेत. पण मला त्याच्यावर काही बोलायचे नाही. मी हलाल आणि झटक्यावर बोलत होतो. त्यासंदर्भात मला माहिती हवी आहे, ऑन रेकॉर्ड माहिती हवी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात झटका मटनाची किती दुकानं आहेत, असा सवाल जितेंंद्र आव्हाड यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT