Parbhani Threat : मराठवाड्यात पुन्हा रिव्हॉल्व्हरची भाषा; ‘माझ्याकडे रिव्हॉल्व्हरला असते, तुला दाखवतो’, माजी आमदाराच्या मुलाची कालवा निरीक्षकाला धमकी

Former MLA's son threatens canal inspector : संतोष देशमुख खून प्रकरण ताजे असतानाच बीडलगतच्या परभणीत अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा उपस्थित होत आहे.
Parbhani threat Case
Parbhani threat Casesarkarnama
Published on
Updated on

Parbhani, 24 March : परभणी जिल्ह्यातील पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकर यांचे चिरंजीव गोविंद वडीकर यांनी पाणी बंद केल्याच्या कारणावरून एका कालवा निरीक्षकाला धमकी दिल्याचे पुढे आले आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात माझ्याकडे रिव्हॉल्व्हर असतो, मी तुला बघून घेईन, अशी धमकी दिल्याचे उघड झाले आहे.

संतोष देशमुख खून प्रकरण ताजे असतानाच बीडलगतच्या परभणीत (Parbhani) अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा उपस्थित होत आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहावे लागणार आहे.

वरखेडवरून वडीला जाणारे कालव्याचे बंद केल्यामुळे माजी आमदार दिंगबर वडीकर यांचे चिरंजीव गोविंद वडीकर यांनी कालवा निरीक्षकाला (canal inspector ) धमकावल्याचे पुढे आले आहे. माजी आमदार दिगंबर वडिकर यांचे चिरंजीव गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृषा आकात यांच्यातील ऑडिओमधील संवाद पुढील प्रमाणे

गोविंद वडीकर : हॅलो, कृष्णा आकात आहेत का

कालवा निरीक्षक : हो हो

गोविंद वडीकर : मी माजी आमदार वडीकरसाहेबांचा मुलगा संभाजीगनरहून बोलताये

कालवा निरीक्षक : हो, बोला

गोविंद वडीकर : तुम्ही ते ५४ चारीचे पाणी बंद केलं. आमचा खाली तिकडं दहा-बारा एकर ऊस आहे ना. तो जळून चालला आहे.

कालवा निरीक्षक : त्या ५४ चारीचा विषय कसा आहे माहिती आहे का, ती चारी नेहमी चालू असल्यामुळे सगळ्या चारीत अधीक्षक अभियंतच्या आदेशाने सगळ्या चाऱ्यांमध्ये मुरुम टाकला आहे

गोविंद वडीकर : तुमच्या खू कंप्लेंट आहेत, आकातसाहेब. तुम्ही चार-पाच वर्षांपासून तिथं आहात ना. तुमच्या खूप कंप्लेंट आहेत. मी आमदाराचा मुलगा आहे.

कालवा निरीक्षक : हो असूद्या ना. काही अडचण नाही. माझं ऐकून घ्या अगोदर

Parbhani threat Case
Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढविण्याची आमदार सुभाष देशमुखांची घोषणा; विजयकुमार देशमुखांची माघार

गोविंद वडीकर : तुम्ही लोकांचे ऊस जाळू नका. मी आता ५० पोरं घेऊन उद्या सकाळी तिथं येणार आहोत. मी तिथं आल्यावर माझ्याकडे रिव्हॉल्व्हर असतो. मी दम देणारा नाही.

कालवा निरीक्षक : तुमच्याकडं काहीही असूद्या.

गोविंद वडीकर : तुम्ही नुसतं नाव विचारा, गोविंदराव वडीकर. अनिल नक्तेंना विचारा

कालवा निरीक्षक : मला सगळं माहिती आहे. तुमच्या आत्याचा मुलगा कल्याण देशमुख माझ्या शेजारी राहतो.

गोविंद वडीकर : मी चिल्लर लोकांना मोजत नाही. ते लय चिल्लर लोक आहेत ओ आमचे. त्या गरिब लोकांची नावं मला नका सांगू

कालवा निरीक्षक : ते बरोबर आहे. पण तुमची अशी बोलायची पद्धत नाही. तुमची माझी भेट नाही, ऐका ना.

गोविंद वडीकर : तुम्ही लोकांचा ऊस जाळता का.

कालवा निरीक्षक : त्या चारीचं शेड्युलिंग आहे, जे आम्हाला साहेबांनी सांगितलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला करावं लागत असतंय. तुम्ही करून करून काय करणा

गोविंद वडीकर : तुम्ही कोणाला बोलाले, तुमचा फोन रेकॉर्ड करायला मी.

कालवा निरीक्षक : तुम्ही रेकॉर्ड करा साहेब, अडचण नाही. तुम्ही धमकी काय देताय

गोविंद वडीकर : धमकी नाही, तू फक्त चालू करू नको, मग तुला दाखवतो तिथं येऊन. तुम्ही फक्त पोकलेन आणून चालू करू नका, मग पाहा.

कालवा निरीक्षक : उद्या आमच्या साहेबाच्या आदेशाने चालू होईलही.

गोविंद वडीकर : पाहू, उद्या पाहू

कालवा निरीक्षक : तुम्ही करून करून माझी बदली कुठं करणार गडचिरोलीत.

गोविंद वडीकर : बदली नाही, तुला औरंगाबादहून सस्पेंड करीन, माहिती आहे का

कालवा निरीक्षक : करा हो साहेब.

गोविंद वडीकर : चॅलेंज आहे माझं

कालवा निरीक्षक : करा हो साहेब, बिनधास्त, काही अडचणा नाही.

गोविंद वडीकर : चार आमदार खिशात घेऊन फिरतो, राजेशदादा एका मिनिटात फोन उचलतात, बोला गोविंदराव... मी आता तुमचा कार्यक्रम लावणार, महिन्याने लावीन किंवा सहा महिन्यांनी पण लावणार. तुम्ही उद्या पाणी सोडू नका, मग माजी आमदाराचा मुलगा काय करतो ते दाखवतो.

Parbhani threat Case
Nitesh Rane : राणेंना आता जेजुरीतूनच झटका; ‘आमच्या भावना दुखावल्यात, मल्हार सर्टिफिकेशनचे नाव बदला; अन्यथा...’, नागरिक आक्रमक

कालवा निरीक्षक : मला धमक्या देऊ नका. माझं जरा ऐका.

गोविंद वडीकर : मी उद्या तुझी तक्रार करतो. औकातीत राहायचं, पंधरा हजार रुपये पगार आहे ना. मी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं ऐकत नसतो. तुझी माझी काय रेंज आहे. मी कोण आहे, तुला सांगितलंय ना.

कालवा निरीक्षक : तुमची आमची रेंज नाही ना. तुम्ही आम्हाला फोन करायची गरज नाही. आमच्या साहेबांनी सांगितलं तर संपूर्ण कॅनॉल तुमच्याकडं येईल

गोविंद वडीकर : तू आता बोलू नको, ठेव फोन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com