Nilesh Rane, Sanjay Raut Latest News
Nilesh Rane, Sanjay Raut Latest News  sarkarnama
मुंबई

..तर संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत असेल...

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut : तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीने (ED) ताब्यात घेतले आहे. आज (३१ जुलै) सकाळी राऊतांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने त्यांच्या घरी छापेमारी केली होती. दरम्यान या घडोमोडींवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊतांवर निशाणा साधला साधला असून आता राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत असेल, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. (Nilesh Rane, Sanjay Raut Latest News)

निलेश यांनी ट्विटमध्ये "संजय राऊत यांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत", असे कॅप्शन देत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. निलेश यामध्ये म्हणाले की, आज सकाळी ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी पोचले. विषय होता पत्राचाळ जो घोटाळा जवळपास बाराशे कोटींचा आहे. या घोटाळ्यात जे कुणी पार्टी आहे. त्यामध्ये संजय राऊत सुद्धा आहेत. मात्र चौकशीला सहकार्यच करायचं नाही असं राऊतांनी ठरवलं होत. त्यामुळे ईडीला त्यांच्या घरी जावं लागलं. बाराशे कोटींचा एवढा मोठा घोटाळा झाल्यामुळे राऊतांना ईडीच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागणार. ब्रिटिशांनी देश सोडताना काय राऊतांच्या नावाने प्रमाणपत्र दिले आहे का? की याच्यावर कारवाई होता काम नये. यांनी असले चाळे केले तरी चालतील, महिलांना शिव्या घातल्या तरी चालेल तरी याला काय करू नका, असे प्रमाणपत्र राऊतांकडे आहे का? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलतांना निलेश म्हणाले की, संजय राऊतांनी नाटक करणं बंद करावे, भाड्याचे लोकांना जमा केले. त्यांच्यावर पोलिसांचे बांबू पडल्यावर एकही संजय राऊत यांच नाव काढणार नाही. यामुळे चौकशीला सहकार्य करा तरच मार्ग निघू शकतो. पण उगीच जर तुम्ही धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला तर तुमची पुढची मुलाखत जेमध्ये जेलर सोबतच होईल,असा इशारा निलेश राणे यांनी राऊतांना दिला.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी आज सकाळपासूनच ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरी गेले होते. आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आधी पत्राचाळ प्रकरणी राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होते. तसेच मागील आठवड्यात २ वेळा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचे कारण देत त्यांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र आज अचानक ईडीचं पथकाने राऊतांच्या घरी पोहोचले होते. आता याप्रकरणी काय होतं हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT