Nitesh Rane Sarkarnama
मुंबई

Malhar certification : जेजुरीचा राणेंना झटका की समर्थन? 'मल्हार' नावावरून वाद पेटला! संस्थानच्या दोन भूमिका समोर

Malhar Name Controversy : भाजप नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचं जाहीर केलं आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू समाजातील मटण दुकानदारांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 12 Feb : भाजप नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देणार असल्याचं जाहीर केलं आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून हिंदू समाजातील मटण दुकानदारांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे.

मात्र, त्यांच्या या घोषणेमुळे मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळातच 'मल्हार' या नावावरुन दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. मटण सर्टिफिकेटसाठी देवाचं नाव देणं योग्य नसून मल्हार देवता ही शाकाहारी आहे. या देवाचं मुक्या प्राण्यांवर नितांत प्रेम आहे.

त्यामुळे हे मल्हार सर्टिफिकेट असं नाव मटण दुकानदारांना देऊ नये, ते त्वरीत बदलावं अशी मागणी करणारं पत्र मार्तंड देवसंस्थान जेजुरी विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणेंना (Nitesh Rane) लिहिलं आहे. तर दुसरीकडे राणेंनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांच्या त्यांच्या या निर्णयाबद्दल आपण त्यांचा सत्कार करणार असल्याचं विश्वस्त मंगेश घोणे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता देवस्थानच्या विश्वस्तांमध्येच 'मल्हार' या नावावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगेश घोणे म्हणाले, आपण कोणत्याही शुभकार्याची सुरूवात आराध्य दैवताच्या आणि कुलदैवताच्या नावाने करतो. त्यामुळे मल्हार या नावाने मटण दुकानदारांना सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला असेल तर ही आनंदाची बाब आहे.

या निर्णयाबद्दल मी नितेश राणे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत घोणे यांनी या निर्णयाचं स्वागत करत दिला आहे. त्यामुळे आता मल्हार या नावावर महायुती सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT