Satish Bhosale News : सतीश भोसले उर्फ 'खोक्या' बीड जिल्ह्यातून हद्दपार!

Satish Bhosale, following his arrest, has now been expelled from Beed district as part of legal proceedings. Get the latest updates on this development. : एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चर्चेत आलेला सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.
Satish Bhosale News
Satish Bhosale NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : आठवडाभरापासून विविध कारणाम्यांनी चर्चेत आलेल्या आणि भाजप आमदार सुरेश धस यांना टीकेचा धनी बनवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खोक्याची जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे.

एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चर्चेत आलेला सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. मारहाण करतानाच व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चा सुरू असतानाच खोक्याचे अनेक थक्क करणारे , वाहनांत नोटांचे बंडल ठेवणे, सोफ्यावर बसून नोटांचे बंडल आणि पैशाची उधळण, शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा, हेलिकाॅप्टर सोबत, असे बरेच व्हिडिओ बाहेर आले.

भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहोबाजूने टीका झाली. (Beed News) अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी भोसले विरोधात गुन्हा नोंद केला. दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. वनविभागाच्या छाप्यात त्याच्या घरी शिकारीचे साहित्य आणि गांजा आढळल्याने हा देखील गुन्हा त्याच्यावर आहे.

Satish Bhosale News
Suresh Dhas News : ‘खोक्या’च्या अटकेनंतर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अत्यंत चांगली...

पोलीसांनी मुसक्या आवळल्यानंतर खोक्या फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी शिरुरमध्ये बंद पाळून मोर्चाही काढण्यात आला होता. सहा दिवसांपासून फरार असलेला खोक्या याला बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराज येथून अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांत जिल्ह्यात आणून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यापुवीच त्याला आणखी एक धक्का बसला आहे.

Satish Bhosale News
Satish Bhosale arrested : 'खोक्या'ला मदत करणारे सहआरोपी होणार; पोलिस अधीक्षक नवनीत कावतांनी उचललं मोठं पाऊल

शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही सतीश भोसले यांच्याविरोधात गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले.

Satish Bhosale News
Suresh Dhas On Ajay Munde News : अजय मुंडे लहान, त्याला काही माहित नाही; धनंजय मुंडेंनी बोलावं, मग उत्तर देईन!

दरम्यान, सतीश भोसले यांच्याविरोधातील हद्दपारीचा प्रस्ताव वर्षभरापासून पडून होता, अशी माहिती आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाई होऊ नये, यासाठी कोणाचा राजकीय दबाव होता. आता अचानक त्याच्या तडीपारीच्या रखडलेल्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी कशी मिळाली? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com