Nitin Gadkari  sarkarnama
मुंबई

Nitin Gadkari News : गोंधळ घालणाऱ्या खासदारांना नितीन गडकरींनी करुन दिली अटल बिहारी वाजपेयींची आठवण!

Maharashtra Politics : महाराष्ट्रात काय चाललंय माहित नसल्याची दिली कबुली

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : संसदेत गोंधळ घालणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभेतील तब्बल १४६ खासदारांना निलंबीत केले आहे. त्यामुळे विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. विरोधीपक्षाने मोर्चा काढून याचा निषेध देखील केला. मात्र, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी विरोधीपक्षांचे कान टोचले. आपली बाजु संयतपणे मांडता येऊ शकते. त्यासाठी आक्रमक होण्याची आवश्यकता नाही, असे सल्ला देत नितीन गडकरींनी दिला. 'सकाळ'च्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर यांनी मुंबईतील विलेपार्ले येथे लोकमान्य सेवा संघाच्या 'लोकमान्य गप्पा' कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली.

मी राज्यात मंत्री असताना घाटकोपरमधील एका पुलाचे उद्घाटन करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांना बोलवले होते. त्यावेळी ते म्हणाले होती की इतका दंगा का करतायेत. खरोखरच अटल बिहारी यांनी अगदी संयतपणे आपले म्हणणे संसदेत मांडले आहे. लोकसभेत मर्यादेचे पालन केले. त्यांच्या वागण्यात किती जबाबदारी होती, असे म्हणत विरोधी पक्षात अटल बिहारी असताना कीती संयतपणे वागत होते याची आठवण गडकरी यांनी करून दिली.

कुठे तरी समजून घेतले पाहिजे की विरोधाची मर्यादा किती असली पाहिजे, असे म्हणत गडकरी यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. आपल्या जडण घडणीविषयी सांगताना गडकरी म्हणाले, मी सामान्य व्यक्ती आहे. जे चांगले घडले आहे ते राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातून घडले आहे. संस्कारातून माणूस बदलू शकतो. ही प्रक्रिया आहे ती चालत राहिल. विदेशातील लोक विचारतात की तुम्ही येवढं काम कसं करता. मी त्यांना येवढच म्हणतो की देशासाठी, सामान्यांसाठी जे करू शकतो ते केलं पाहिजे. त्यातच आनंद आहे.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य टाळले

महाराष्ट्रात तीन राजकीय पक्षांचे सरकार सत्तेत आहे त्यामुळे राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात काय चाललंय याविषयी प्रश्न विचारला असता. "मी मुंबईतच येत नाही.दोन महिन्यातून आज आलो आहे.मी दिल्लीत जायला इच्छुक नव्हतो. आता दिल्लीच डेस्टनी झाली आहे.त्यामुळे मला महाराष्ट्रात काय चाललंय हे माहित नाही. माहित पण करून घ्यायची नाही, असे सांगत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे टाळले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT