New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेचे राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमकी झडत असतात. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यापूर्वी मोदींविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे राहुल यांना खासदारकीही गमवावी लागली होती.तसेच काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान, मोदींना खिसेकापू आणि पनौती असेही म्हटले होते. हीच टीका आता राहुल गांधी यांना भोवण्याची शक्यता आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दणका दिला आहे. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टिप्पणीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तसेच न्यायालयाने राहुल गांधी यांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे असेही म्हटलं आहे.या प्रकरणी भरत नागर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर (Narendra Modi) खिसेकापू, पनौती मोदी अशी खोचक टीका केली होती. यावरुन भाजपकडून राहुल यांचा तीव्र संताप व्यक्त करतानाच जोरदार निदर्शने करण्यात आली होती. राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का देत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर आता राहुल यांना प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्ये भोवणार असल्याची चिन्हे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिल्ली न्यायालयाने नेमकं काय म्हटलं...?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) खंडपीठाने राहुल गांधी यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढतानाच निवडणूक आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी विधाने योग्य नाहीत. उच्च न्य़ायालयाने या संदर्भात राहुल गांधी यांना नोटीसही पाठवली आहे. उत्तर दाखल करण्याची मुदत संपली असून गांधी यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्याप आलेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. याचमुळे आयोगाला या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देत असल्याचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.