Sameer Wankhede Vs Shahrukh Khan : जेव्हा जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा त्यामधील शाहरुख खानच्या एका डायलॉगची प्रचंड चर्चा झाली होती. ' बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर ' हा तो डायलॉग ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आर्यन खान केसचे तपास अधिकारी समीर वानखेडेंशी संबंध जोडला जात होता. शिवाय सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला होता.
यानंतर सर्वानाच या डायलॉगवर समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे कशी प्रतिक्रिया देणार हे सगळ्यांना पाहायच होतं. अखेर शाहरूखच्या त्या फेमस डायलॉगवर समीनर वानखेंडेनी(Sameer Wankhede) प्रतिक्रिया दिलीच.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
समीर वानखेडे म्हणातात, हा डायलॉग मला पूर्णपणे रोडछाप वाटला. मी चित्रपट पाहत नाही आणि कोणते डायलॉगही ऐकत नाही. मला या चित्रपटाबाबत काहीच माहीत नाही. जर कोणी यावरून मला लक्ष्य केलं असेल, तर मी त्यांचं इंग्रजीतून देईन.
आणि समीर वानखेडे यांनी म्हटले की, ''मी प्रत्येक त्या पूलाची आग अनुभवली आहे आणि त्या राखेवर नाचलो आहे, जो कधी तरी मी जाळला आहे. यामुळे मला तुम्ही नरकाची भीती दाखवून शकत नाही. - निकोल लियोन्सचं हे एक उदाहरण जे मला नेहमीच प्रेरणा देतं.''
या वर्षाच्या सुरुवातीसच समीर वानखेडेंवर आरोप झाला होता की, त्यांनी आर्यनला तुरुंगातून सोडण्यासाठी शाहरुखकडून(Shahrukh Khan) पैसे उकळले होते. मात्र हे सर्व आरोप समीर वानखेडेंनी अर्थातच फेटाळले होते.
2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेनंतर आर्यन खान(Aryan Khan) जवळपास महिनाभर तुरुंगात होता. याचप्रकरणात आर्यनचा दोस्त अरबाज मर्चंटचंही नाव समाविष्ट होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.