Prakash Ambedkar, Nitin Gadkari Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : नितीन गडकरी पुढचे पंतप्रधान असणार; प्रकाश आंबेडकारांनी सांगितलं कारण

Sunil Balasaheb Dhumal

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीच्या दारात खोळंबलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर किती जागा लढवायच्या ते जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी आघाडीला दिला आहे. तर भाजपने केलेल्या ४०० पारचा नारा सक्सेसफूल झाला नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर नितीन गडकरी असतील, असे मोठे विधानही आंबेडकरांनी केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनी बोलत होते.

देशात 400 पारचा नारा भाजपने दिला आहे. त्यासाठी एनडीएच्या वतीने नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा पुढे केला आहे. मात्र भाजपच्या या चालीविरोधात इंडिया आघाडीनेही जोरदार तयारी केलेली आहे. काही करून यंदा भाजपचा वारू रोखायचाच, असा चंगही काँग्रेसने बांधला आहे. त्यातून भाजपप्रणित एनडीएला 170 ते 175 जागा मिळतील असा दावाही आंबेडकारांनी केला आहे.

दशभर भाजपने 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. तर हे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्यात मिशन 45 राबवले जात आहे. त्यासाठी राज्यातील विरोधातील अनेक दिग्गज मंडळींना आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर देशात भाजपला किती जागा मिळतील, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, देशात भाजपला 400 चा आकडा पार करता येणार नाही. भाजप फक्त 170 ते 175 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर राज्यांतील मिशन 45 वर मात्र त्यांनी आपली भूमिका उघड केली नाही.

भाजपचे टार्गेट हुकले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील, असेही आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले, भाजपला 170 ते 175 जागा मिळतील. एनडीएला 200 च्या खाली जागा मिळाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान होण्याची संधी आहे. कारण त्यांचे सर्वपक्षीय संबंध सलोख्याचे आहेत. गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह त्यांनी भूपेंद्र यादव यांचेही नाव पुढे केले. इंडिया आघाडीकडून मात्र आंबेडकरांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलिन या प्रादेशिक नेत्यांची नावे घेतली

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT