Ahmednagar Loksabha News : 'सागर' बंगल्यावरच विखेंशी चर्चा करणार; आमदार शिंदेंचे सूचक विधान

Loksabha Election 2024 : 'भाजपने नगर दक्षिणेतून उमेदवारी जाहीर केला असला तरी मागील पाच वर्षांत घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर होती हे स्पष्ट करेल...'
Ram Shinde News
Ram Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजपने नगर दक्षिणेतून उमेदवारी जाहीर केला असला तरी मागील पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर होती हे स्पष्ट करेल, असे भाजप आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले. दरम्यान, तिकीट एकदा जाहीर झाल्यावर पाचवेळा जाहीर माफी मागण्याची वेळ यायला नको होती, अशी सूचक टिपण्णीही शिंदे यांनी खासदार सुजय विखेंचे नाव न घेता केली.

भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'नगर दक्षिणेतून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो, याआधीही दोन निवडणुकांच्या काळात मी इच्छुक होतो. मात्र मला उमेदवारी मिळाली नाही. कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नाही. ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही जाहीरपणे दिलेली आहे.

Ram Shinde News
Nilesh Lanke News : लोकसभेसाठी नीलेश लंकेंना आमदारकीवर पाणी सोडावे लागणार?

पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनीही माझ्याशी चर्चा केली. त्या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्याचे समजले. मात्र, फडणवीस यांच्याकडून मला काहीही अजूनपर्यंत निरोप नाही, पण नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होईल. त्यानंतर ते मुद्दे काय होते ते मी स्पष्ट करेल. मागील चार-पाच वर्षात झालेल्या विविध घटना व मुद्द्यांचे निरसन होणे आवश्यक आहे, असे सुचक भाष्य आमदार शिंदे यांनी केले.

आशीर्वाद संस्कृतीचा भाग

पारनेरचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) महायुतीचा भाग आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याला मी गेलो होतो. हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्याच्या कार्यक्रमास गेल्यावर चांगले बोलले पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे या भूमिकेतून मी त्यांना मनोकामना पूर्ण होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पण महायुतीचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. राज्याचे वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे आमदार लंके यांच्या सद्य भूमिकेबद्दल मी काही बोलू शकत नाही. वरिष्ठ नेतेच तो प्रश्न सोडवतील, असे भाष्यही आमदार शिंदे यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीय रंग देणे चुकीचे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडी कडून अटक झाले आहेत. मागील दोन वर्षापासून याबाबत चौकशी सुरू होती, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली तर मढ्यावर पोळी भाजण्याचे काम काँग्रेस करीत आहे. केजरीवालांनी केलेला गुन्हा व केलेला भ्रष्टाचार यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. केवळ त्यांच्यावरील कारवाईला विरोधकांकडून राजकीय रंग दिला जात आहे, असा दावाही आमदार प्रा. शिंदे यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Ram Shinde News
Congress News : रविभाऊ, आता कुठच्या Ex स्टॅडिंग चेअरमनला पाडायला निघालात, आधी आबा बागुलांना सांभाळा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com