Pune Lok Sabha Election : 'जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा'; धंगेकरांनी घेतला बापट यांचा आधार...

Lok Sabha Election 2024 : मोहोळ यांच्या कोथरूड भागातील मोनोरेल प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत धंगेकरांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
Ravindra Dhangekar Banner
Ravindra Dhangekar BannerSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत आमदार रवींद्र धंगेकर यांचे असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशीच सरळ लढत होणार आहे. उमेदवारी जाहीर होताच दोघांनीही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. ते शहरातील विविध भागात जाऊन विविध मार्गांनी प्रचार करत आहेत. यातच दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासोबत धंगेकरांचा फोटो व्हायरल होत असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चांना उधाण आले आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसने कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी संधी देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी निश्चित झाल्याचे लक्षात येताच धंगेकरांनी दुसऱ्या दिवसापासूनच प्रचार सुरू केला. प्रतिस्पर्धी उमेदवार मोहोळ यांच्या कोथरूड मतदारसंघात जाऊन या भागात उभारण्यात येत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत आपला प्रचार सुरू केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar Banner
Raju Shetti On Sharad Pawar NCP : उरलेल्या राष्ट्रवादीत भाजपचे हस्तक; राजू शेट्टींचा नेमका रोख कुणाकडे?

दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी दिवंगत खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांच्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवर 'जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा, मी पुणेकर' अशा आशयाचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या फोटोवरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. हा फोटो नेमका कोणी तयार केला आणि कोणी व्हायरल केला, याची माहिती समोर येत नसली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हा फोटो व्हायरल केला जात आहे.

Ravindra Dhangekar Banner
Anna Hajare On Kejriwal : 'केजरीवालांनी माझं ऐकलं नाही, आता त्यांना अटक...' ; अण्णा हजारे म्हणाले...

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात असलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट आणि आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या फोटोवर बापट यांचे चिरंजीव गौरव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने बापट यांचा फोटो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वापरणे आणि सर्वत्र व्हायरल करणे याचा अर्थ काँग्रेसचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास राहिला नाही. त्यांना पराभव दिसू लागला आहे. बापटसाहेबांचा फोटो अशा पद्धतीने वापरणं खुपच दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामावर पुणेकर नागरिकांचा विश्वास आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने कितीही फोटो व्हायरल केले तरी त्याचा परिणाम भाजपच्या उमेदवारावर होणार नाही. यामधून कॉंग्रेसची पराभूत मानसिकता लक्षात येतं. आम्ही हे हास्यास्पद म्हणून सोडून देतोय, असेही गौरव बापट म्हणाले.

पुणे शहरात भाजपने दिलेला उमेदवार सक्षम आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल. भाजपने गेल्या दहा वर्षात शहरात अनेक कामे केल्याने पुणेकरांचा पाठिंबा भाजपला मिळून मोठ्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खासदार बापटांच्या निधनानंतर होणारी ही पुण्यातील पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत संपूर्ण बापट कुटुंब हे भाजपसोबत असून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याचे गौरव बापट यांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Ravindra Dhangekar Banner
Raju Shetti : महाविकास आघाडीला गळ पण प्रतिसाद नाहीच! आता इरादा पक्का, राजू शेट्टी म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com