NitishKumar sarkarnama
मुंबई

Patna Opposition Unity Meeting: 'नीतीशकुमार त्यावेळी कार्यकर्ता होते, आज विरोधी ऐक्याचे यजमान... उत्तम आरंभ...'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : जयप्रकाश नारायण यांनी याच पाटण्यातून विरोधी ऐक्याची साद घातली होती. पुढे जे झाले, तो इतिहास आहे. त्या वेळी कार्यकर्ता असलेले नितीशकुमार आज बिहारचे मुख्यमंत्री आहेत अन या ऐक्याचे यजमान. हा उत्तम प्रारंभ आहे, अशा शब्दांत देशातील विरोधकांच्या ऐक्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आशावाद व्यक्त केला. (Nitish Kumar was then an activist, today hosts opposition unity; Great start: Sanjay Raut)

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या पुढाकाराने पाटणा (Patna) येथे भाजप विरोधातील सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, मलिकार्जून खर्गे, शरद पवार, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी, प्रफुल्ल पटेल, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, लालूप्रसाद यादव, महिबुबा मुफ्ती, उमर अब्दुला, संजय राऊत, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आदी नेते या मेळाव्यात सहभागी झाले आहेत.

खासदार राऊत म्हणाले की, देशातील विरोधी पक्षांच्या ऐक्याची बैठक ही एकत्र येण्याची उत्तम सुरुवात आहे. देशातील महत्वाचे पक्ष भाजपच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. विरोधकांच्या या ऐक्याबद्दल नागरिकही प्रचंड आशावादी आहेत. ते भाजपच्या पर्यायाकडे डोळे लावून बसलेले आहेत. जयप्रकाश नारायण यांनी याच पाटण्यातून विरोधी ऐक्याची साद घातली होती आणि पुढे इतिहास घडला होता.

त्या ऐतिहासिक आंदोलनात त्यावेळी कार्यकर्ता असलेले नितीशकुमार आज बिहारचे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे या मेळाव्याचे यजमानही तेच आहेत. त्यामुळे विरोधी ऐक्याची ही उत्तम सुरुवात आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील नेत्यांची जबाबदारी देवेश ठाकूर यांच्याकडे

उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडून जातात, त्यामुळे देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे मोठे महत्व आहे. भाजपच्या धोरणांबाबत यात चर्चा केली जात आहे. तसेच, विरोधी पक्षांवर वरवंटा फिरवण्याची पध्दत या विरोधात रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल. महाराष्ट्रातील नेत्यांची व्यवस्था मुंबईत निवास असलेल्या बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेश ठाकूर यांनी उचलली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT