Nana Patole-KCR
Nana Patole-KCRSarkarnama

BRS News : नाना पटोले यांचा बीआरएसवर गंभीर आरोप; 'त्यांचा रेट ठरलेला आहे, त्यांचं सर्वकाही पैशावर चाललंय'

महाराष्ट्रात १९९९ मध्ये उत्तर प्रदेशाचा एक पक्ष आला होता. या आधी हैद्राबादचा एक पक्ष आला होता. आता दुसरा येतोय याने काहीही फरक पडणार नाही.
Published on

Solapur News : भारत राष्ट्र समितीचे रेट ठरलेले आहेत, त्यांचे पैशाच्या भरवश्यावर काम सुरू आहे. बीआरएसच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीमुळे काँग्रेस पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, असे गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. (Nana Patole's serious allegations against BRS)

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे दोन दिवस दौऱ्यावर आहेत. सोलापुरात आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी पटोले यांचा सपत्नीक, सकुटुंब सत्कार केला. त्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘बीआरएस’वरही निशाण साधला.

Nana Patole-KCR
Konkan Shivsena News : केसरकरांनी कुठल्याही पक्षातून निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित; ठाकरे गटाने रणशिंग फुंकले

पटोले म्हणाले की, मी कल्याण डोंबिवलीमध्ये गेले होतो. जो भाजप आणि शिंदे गटाचा गड म्हणतात. पण तिथेही रस्त्यावर उतरून लोकं काँग्रेसचे स्वागत करतं होते. पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेमध्ये पाहिजे, असे ते सांगत होते. कारण या देशाचे, लोकशाहीचे मूळ हे काँग्रेसचं आहे. काँग्रेस संपुष्टात येणे म्हणजे लोकशाही संपुष्टात येणे ही भावना आतां लोकांमध्ये जागृत झाली आहे.

बीआरएस पक्षासारखे किती आले, किती गेले आपण पाहिलंय. महाराष्ट्रात १९९९ मध्ये उत्तरप्रदेशाचा एक पक्ष आला होता. या आधी हैद्राबादचा एक पक्ष आला होता. आता दुसरा येतोय याने काहीही फरक पडणार नाही. चार लोकांना मदत करायची, त्याचा व्हिडीओ बनवायचा आणि खोटा प्रचार करायचा. हा गुजरात पॅटर्न लोकांनी पाहिला, तोच आता तेलंगणा पॅटर्न झाला आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole-KCR
Vidarbha's Congress Leader Join NCP : राष्ट्रवादीचा विदर्भात काँग्रेसला धक्का; वर्ध्यातील नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

तेलंगणाचा शेतकरी किती अडचणीत आहे, सामाजिक व्यवस्थेत किती बिघाड आहे, हे तिथल्या लोकांना माहिती आहे. तेलंगणातील काँग्रेसचे नेते इथे प्रचाराला येतील आणि तेलंगणातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती सांगतील. वाएसआर रेड्डी यांची मुलगी काँग्रेसमध्ये आली आहे, असेही पटोले यांनी नमूद केले.

पटोले म्हणाले की, बीआरएस पक्षाचं सगळं काम पैशाच्या भरवश्यावर सुरु आहे. कारण, सर्वांना माहिती त्यांचा रेट ठरलेला आहे. पण कोणी त्यावर बोलतं नाही, पण काहीजण दबक्या आवाजात बोलतात. रेट काय यावर मी बोलणार नाही. पण प्रत्येक पेपरला चॅनेलला जाहिरात हे लोकांना दिसतंय

Nana Patole-KCR
Sangram Thopte News : किरीट सोमय्या वाढविणार काँग्रेस आमदार थोपटेंचे टेन्शन : भोरमध्ये येऊन दिले चॅलेंज

सोलापूर जिल्ह्यातील एका नेत्याचे नाव चर्चेत

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका नेत्याचे नाव देखील बीआरएससाठी समोर येतं आहे, त्यामुळे किती मोठे प्रलोभन आहे, या विषयी मला इथे बोलायचे नाही. महाराष्ट्र हा शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे. काँग्रेस हा एकमेव आहे जो हा विचार जोपसतोय. मागील ६० वर्षात काँग्रेसने संविधान जोपसलं म्हणूनच चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला, ही काँग्रेसची देण आहे. त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, हे लोकांना कळलंय, असा दावा पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com