Konkan Shivsena News : केसरकरांनी कुठल्याही पक्षातून निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित; ठाकरे गटाने रणशिंग फुंकले

दीपक केसरकर हे आजच्या दिवशी शिंदे गटात सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर आज केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले.
Thackeray Group News
Thackeray Group NewsSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar Vs Thackeray Group : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळेत येत्या दोन दिवसांत शिक्षणसेवक न दिल्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाचा जिल्हा परिषदेवर मोर्चा निघेल, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय फडके यांनी आज येथे दिला. शिवसैनिकांशी गद्दारी करून दीपक केसरकर शिंदे गटात गेले. त्यांनी कुठल्याही पक्षातून पुन्हा निवडणूक लढवावी. येथील जनता त्यांचा निश्चितच पराभव करेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला. (Deepak Kesarkar's defeat is certain: Thackeray faction warns)

सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे आजच्या दिवशी (२२ जून २०२२ रोजी) शिंदे गटात (Eknath Shinde) सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर आज केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) जोरदार घोषणाबाजी देत येथील गांधी चौकात आंदोलन करत निदर्शन करण्यात आले. यावेळी ५० कोटींचा देखावाही उभारला होता.

Thackeray Group News
Vidarbha's Congress Leader Join NCP : राष्ट्रवादीचा विदर्भात काँग्रेसला धक्का; वर्ध्यातील नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह बाळा गावडे, मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, सुनील गावडे, श्रुतिका दळवी, भारती कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत आदी सहभागी झाले होते. यावेळी '५० खोके, एकदम ओके', 'आमदार तुपाशी, जनता उपाशी', 'या सरकारचं करायचं काय?, खाली डोके वर पाय' अशा घोषणा देत मंत्री केसरकर यांचा निषेध केला.

Thackeray Group News
Sangram Thopte News : किरीट सोमय्या वाढविणार काँग्रेस आमदार थोपटेंचे टेन्शन : भोरमध्ये येऊन दिले चॅलेंज

पडते म्हणाले की, शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन केसरकर यांना निवडून दिले होते. मात्र, केसरकर मतदारांचा व शिवसैनिकांचा कोणत्याही विचार न करता गद्दारी करून शिंदे गटात सामील झाले. म्हणून आजचा दिवस आम्हा शिवसैनिकांसाठी गद्दार दिवस आहे.

केसरकरांनी शिंदे गटात जाताना या भागाचा विकास व्हावा म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, आज वर्ष झाले तरी या भागाचा विकास झाला का? केवळ घोषणाबाजी करणे आणि जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणे हेच काम केसरकर करत आले आहेत. त्यामुळे त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षातून निवडणुकीत उतरावे. येथील शिवसैनिक त्यांचा पराभव निश्चितच करेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

Thackeray Group News
Money Laundering Allegation : देवेंद्र फडणवीसांचे एकदम खास अन्‌ ५०० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा आरोप

आज शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना शिक्षण खात्याला काळिमा फासण्याचे काम केसरकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील तब्बल १२१ शाळा शून्य शिक्षकी होण्यासही केसरकरच जबाबदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येथे दोन दिवसात जर या शून्य शिक्षकी शाळेमध्ये शिक्षक सेवक न दिल्यास शिवसेनेचा मोर्चा जिल्हा परिषदेवर निघेल, याची दखल त्यांनी घ्यावी. आज बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्व-खर्चातून शिक्षक सेवक देऊन मुलांचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिक्षणमंत्री चिडीचूप आहेत, हे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी खंतही पडते यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com