Nitesh Rane - Sanjay Raut - Sunil Raut Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane On Raut Brothers: 'राऊत बंधूंना कुणी 'शंभर रूपये' देणार नाही'; राणेंची बोचरी टीका !

Nitesh Rane Criticized Raut Again: "मोदी-शहांनी मुंबई वाचवली, नाही तर उद्धव ठाकरेंनी ती विकून टाकली असती !"

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: भाजपचे आमदार व प्रवक्ते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. सुनील राऊत यांनी आपल्याला आजही विरोधकांकडून १०० कोटीची ऑफर आहे, असा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या याच दाव्याचा खरपूस समाचार घेत, राणे यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. "100 कोटी कसले, त्यांना तर 100 रुपये पण कुणी देणार नाही, असे राणे म्हणाले. (Latest Marathi News)

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले, "सुनील राऊत याला पक्षात घ्यायला कोणी 100 कोटी नाही तर 100 रुपये पण देणार नाही. राऊत बंधू खोटारडे आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हाच सुनील राऊत अमित शहांच्या कार्यालयाबाहेर व भाजप कार्यालयाबाहेर चार-चार तास थांबून होता.आम्ही भाजपात प्रवेश करतो, पण माझ्या भावाला सोडा, अस सांगत होता, एकेरी उल्लेख करत राणेंनी राऊतांनी डिवचलं.

राणे पुढे म्हणाले, "राऊत यांनी नीती आयोगाबाबत टीका केली. तसेच, मुंबई महाराष्ट्र राज्यापासून तोडणार अशी जुनी टेपरेकॉर्डर पुन्हा सुरू आहे. मोदी व शहा नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती. मुंबईला कोण गिळत होत तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मुंबई वाचवण्याचं काम मोदी- शहा आणि फडणवीस केली आहे."

काय म्हणाले होते सुनील राऊत ?

मला आजही शंभर कोटी रूपयांची ऑफर आहे. कारण मी आमदार आहे. पण माझा ब्रँड संजय राऊत यांच्या मागे आहे. पण या १०० कोटीत मला शिवसैनिकांची ताकद मिळणार आहे का? अशी निष्ठा-माझ्यासाठी पक्षासाठी जीवाची बाजी लावून कार्य करणारे शिवसैनिक मिळणार आहेत का? असे सुनील राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT