Mumbai News : खासदार संजय राऊत यांना आमचा शेवटचा प्रेमळ सल्ला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करू नका; अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला होता. त्यावर संजय राऊत चांगलेच भडकले. मला धमक्या देऊ नका. माझ्या नादाला लागाल, तर तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असा प्रतिइशाराच राऊतांनी चव्हाण यांना दिला. (Ajit Pawar group's warning infuriated Sanjay Raut)
सामानातील अग्रलेखावरून आज अजित पवार गट आणि खासदार संजय राऊत हे आमने सामने आले आहेत. अग्रलेखातील भाषेवरून अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी खासदार संजय राऊत यांना सुनावले होते. ते म्हणाले की, राऊतसाहेब आपण सर्वज्ञ आहात. आपल्या दिनक्रमाची सुरुवात लोकांच्या शिव्या खाऊन होते. यापुढे आमच्या नेत्यावर आपण टीका केली तर जशास तसे उत्तर तुम्हालाही भेटेल. अजित पवार यांचे राज्याच्या राजकारणात काय योगदान आहे, कोरोना काळातील काय योगदान आहे, हे तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारा.
जेव्हा तुमचे नेते घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होते, तेव्हा दररोज सकाळी सात वाजता मंत्रालयात आणि फिल्डवर पोचून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काम करीत होते. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशी बोला, असे सूरज चव्हाण यांनी राऊतांना सुनावले होते.
सूरज चव्हाण यांच्या इशाऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले की, मी कधीही खालच्या भाषेत बोलत नाही. आजच्या अग्रलेखात खालच्या पातळीवर काय आहे, हे मला दाखवलं तर मी राजकारण सोडेन. तुम्ही पक्ष फोडणाऱ्याला निधी देता आणि जे एकनिष्ठ आहेत, त्यांना तुम्ही निधी देत नाही. निधी हवा असेल तर आमच्या गटात या, असे तुम्ही सांगता.
बोलत असतानाच राऊत एकाकी चिडले आणि म्हणाले की, मला धमक्या देऊ नका… मी डरपोक नाही आणि एजन्सीला घाबरून गुडघे टेकणारा माणूस मी नाही. मी पळपुटा नाही. माझ्या नादाला लागाल ना, तर तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. मला धमक्या देऊ का, अजिबात
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.