Nawab Malik News Sarkarnama
मुंबई

Nawab Malik : नवाब मलिकांना हायकोर्टाचा दणका ; वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज हायकोर्टानं नामंजूर केला आहे. त्यामुळे मलिकांना आजही दिलासा मिळू शकला नाही.

कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात सध्या मलिक सध्या उपचार घेत आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार याची उत्सुकताही होती पण आजही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून करण्यात आला होता.

मलिकांनी कुर्ल्यातील मालमत्तेच्या प्रकरणी दाऊद इब्राहिम आणि 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी असलेल्या सरदार खानसोबत बैठका केल्याचा दावा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने (ED) विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

विशेष न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेत मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील कारवाई करण्यास मान्यता दिली होती. 21 एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

आपल्या चार्टशीटमध्ये ईडीने 17 जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे

दोषारोपपत्रात म्हटले आहे की..

​​​​​​​​​​​​​​नवाब मलिकांचे डि-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचे ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सांगण्यात आले. डि-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT