Kukadi Water : आता बोगदा कसा होणार ; कुकडीचे पाणी पेटणार ? ; डावा कालवा सत्ताधाऱ्यांचा झाला..

Kukadi Left Canal Water Supply Dispute : शेतकऱ्यांवर रोहित पवार अन्याय करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
Kukadi Left Canal Water Supply Dispute  news
Kukadi Left Canal Water Supply Dispute news Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : राज्यात नुकत्याच झालेल्या राजकीय परिवर्तनाने आता कुकडी धरणाखालचा व विशेषत:नगरचा शेतकरी अडचणीत सापडतो की काय अशी शंका आहे. डिंबे ते माणिकडोह या धरणा दरम्यानचा बोगदा आता कळीचा मुद्दा ठरणार आहे.

बोगदा करण्यास मंजूरी असली तरी त्याच्या खोलीवरुन राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुकडी प्रकल्पावर सर्वाधिक वर्चस्व असणारे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोगद्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार यांना लक्ष्य केल्याने राजकारण तापलं आहे.

Kukadi Left Canal Water Supply Dispute  news
Rohit Pawar slams Bharat Gogawle : गोगावलेंवर रोहित पवार भडकले ; म्हणाले, '…असे बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य ?

कुकडीच्या पाण्यावरुन नगर व सोलापुरच्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो ही वस्तुस्थिती असली तरी हा राजकीय आरोप तर नाही ना अशी शंका घेतली जाणार आहे. यापुर्वी कुकडी प्रकल्पावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने त्यांच्याकडून त्याभागातील शेतकऱ्यांच्या हिताचे पाहिले जाते व त्यात नगर व सोलापुरच्या लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा भाजपचे नेते व त्यांचे कार्यकर्ते करीत होते.

राष्ट्रवादीत फूट पडून वळसे पाटील, अतुल बेनके, निलेश लंके हे लाभक्षेत्रातील आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत.करमाळ्याचे आमदार संजय शिंदे तटस्थ असल्याचे समजते. तर खासदार डाँ सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे हे पुर्वीचेच भाजपाचे असल्याने आता कुकडी डावा कालवा आमदार रोहित पवार वगळता सत्ताधाऱ्यांचा झाला आहे.

Kukadi Left Canal Water Supply Dispute  news
Maharashtra Cabinet Expansion : कोण होणार मंत्री ? शिंदे-फडणवीसांच्या अनुपस्थितीत अजितदादा-शाह यांच्यात तासभर खलबतं..

वळसे पाटील यांनी शरद पवार यांना सोडण्याचे कारण रोहित पवार हे असल्याचे सांगतानाच, बोगद्याचा विषय छेडच रोहित पवार हे डिंबेतील पाणी पळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही सांगितले. म्हणजे बोगद्याची खोली डिंबे धरणाच्या तळाला नेण्याचा प्रयत्न करीत असल्याने तेथील शेतकऱ्यांवर रोहित पवार अन्याय करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

ऐन उन्हाळ्यात कुकडीच्या शेतकऱ्यांची पिके जळत असल्याने यावर सर्वसंमतीने तोडगा काढण्याचा निर्णय झाला व त्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला.डिंबे धरणातून येडगावला येणारा ५५ किलोमीटर लांबीचा कालवा गळतीमुळे उपयोगचा नसल्याचा तोटाही कुकडीच्या डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना होतो. त्यातच माणिकडोह धरण पावसाच्या पाण्याने भरले जात नाही.

या धरणातून त्याभागात शेतीचे सिंचन नसल्याने ते सगळे पाणी येडगाव धरणात आणून तेथून ते कुकडीच्या डाव्या कालव्यातून पुणे, नगर, करमाळा येथील शेतीला दिले जाते. त्यातच डिंबे धरणात सुमारे अडीच टीएमसी पाणी अचलसाठा राहत असल्याने त्याचा उपयोग जास्त शेतकऱ्यांना होत नव्हता. परिणामी डिंबे धरणातून माणिकडोह धरणाकडे जर बोगदा काढला व त्यातून उन्हाळ्यात ते पाणी येडगावला आणण्याची योजना तयार झाली व तिला भाजप-शिवसेना सरकारच्या काळात मान्यताही मिळाली.

Kukadi Left Canal Water Supply Dispute  news
Rajya Sabha Election 2023 : राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा ; गुजरातमधून बाबूभाई देसाई..

सोळा किलोमीटर लांबीच्या व २५० कोटी रुपये खर्चाचा हा बोगदा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची चर्चाही सुरु झाली. मात्र पुढे बोगद्याचा विषय रखडला. शरद पवार यांनी त्यासाठी बैठका घेतल्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसंमती घडविण्याचा प्रयत्न केला.

पुणेकरांची भुमिका आणि नगरकरांच्या अपेक्षा

वळसे पाटील यांच्या वक्त्यव्याने आता बोगदा कसा होणार यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तेथील शेतकरी व नेत्यांच्या म्हणण्यानूसार डिंबेच्या तळाला जर बोगदा घेतला तर उन्हाळ्यात हे पाणी काढून नगरला दिले जाईल व तेथील शेतकऱ्यांची पिके जळतील. त्यापेक्षा डिंबे धरणाच्या मध्यभागी जर बोगदा घेतला तर खालचे पाणी तेथील शेतकऱ्यांना वापरता येईल व पावसाळ्यात ओव्हर-फ्लोचे पाण्यातून माणिकडोह धरण भरता येईल.

पुणेकरांच्या दृष्टीने हे योग्य असले तरी तळातून बोगदा काढला तर त्याचा उन्हाळ्यात नगरची जी पिके जळतात त्याला फायदा होईल. शिवाय डिंबेतील अचल साठ्यातील पाणी मिळाल्यास नगर व सोलापुरच्या मोठ्या सिंचनाचा त्याचा फायदा होईल.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com