Rohit Pawar slams Bharat Gogawle : गोगावलेंवर रोहित पवार भडकले ; म्हणाले, '…असे बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य ?

Maharashtra Politics : स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध!
 Bharat Gogawle, Rohit Pawar
Bharat Gogawle, Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु असताना दुसरीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांनी या पदावर दावा केल्यानं पेच निर्माण झाला आहे.

राजगडच्या पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांना ही जबाबदारी दिली जाईल, असे निश्चित झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी स्त्री-पुरुष भेदाचा मुद्दा उपस्थित करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

गोगावले यांच्या विधानावर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गोगावलेंच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी टि्वट करीत गोगावलेंना सुनावलं आहे.

 Bharat Gogawle, Rohit Pawar
Maharashtra Cabinet Expansion : कोण होणार मंत्री ? शिंदे-फडणवीसांच्या अनुपस्थितीत अजितदादा-शाह यांच्यात तासभर खलबतं..

"पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? मी त्यांच्यापेक्षा (अदिती तटकरे) चांगले काम करेन. महिला आणि पुरुष यात थोडा फरक असतोच ना," असे विधान गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहेत. आमदार गोगावलेंचा निषेध करण्यात येत आहे.

"आमदार भरत गोगावले यांच्या विधानाने केवळ आदिती तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर, राज्यातील 6 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध!" असे टि्वट पवारांनी केलं आहे.

 Bharat Gogawle, Rohit Pawar
Rajya Sabha Election 2023 : राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा ; गुजरातमधून बाबूभाई देसाई..

"शरद पवार यांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान सधी दिली, याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असे बेताल वक्तव्य करणे कितपत योग्य आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या (अजित पवार गट) रुपाली चाकणकर यांनीही गोगावले यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे.

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासून तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच, अशी प्रतिक्रिया महाडचे आमदार भरत गोगावले यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com