BMC mayor Race Sarkarnama
मुंबई

BMC Mayor Politics : भाजपमध्ये अमराठी नगरसेवकांचा भरणा; दबदबा बघता मुंबई महापौरपदासाठी मराठी नाव मागे पडणार?

BMC Results Non-Marathi Winners BJP : मुंबई महापालिकेमध्ये अमराठी नगरसेवक सर्वच पक्षांमधून विजयी झाले आहेत. भाजपमध्ये त्यांची संख्या जास्त आहे.

सरकारनामा ब्यूरो

BMC Results : मुंबई महापालिका निवडणूक मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी यावर ठाकरे बंधूंने लढवली. निवडणुकीच्या निकलानंतर किती अमराठी भाषिक उमेदवार विजयी झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

227 नगरसेवकांपैकी तब्बल 75 नगरसवेक हे अमराठी आहेत. त्यामुळे या महापालिकेमध्ये अमराठी नगरसेवकांचा दबदबा असणार आहे. विशेष म्हणजे या अमराठी नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक हे भाजपचे विजयी झाले आहेत.

भाजपमध्ये महापौर पदासाठी प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, प्रीती साटम,मकरंद नार्वेकर, उज्ज्वला मोडक, डॉ. प्रज्ञा सामंत, तेजस्वी घोसाळकर, राजेश्री शिरवडकर, शीतल गंभीर देसाई यांची नावे चर्चेत आहेत. ही मराठी नावे चर्चेत आहेत.

मात्र, अमराठी भाषिक विजय नगरसेवकांची संख्या पाहाता त्यांच्यामधील काही जणांची नावे देखील महापौर पदासाठी चर्चेत येण्याची शक्यता आहे. मात्र, महापौर मराठीच होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

...तर अमराठी नगरसेवक 100 असते

महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना मराठी उमेदवारांना प्राधान्य दिले. अन्यथा या महापालिकेत अमराठी नगरसेवकांची संख्या 100 पार झाली असती, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोणत्या पक्षात किती अमराठी नगरसेवक

भाजप - 33

शिवसेना 4

शिवसेना (ठाकरे) - 8

काँग्रेस - 18

एमआयएम - 7

राष्ट्रवादी काँग्रेस - 3

समाजवादी पार्टी - 2

मनसे - 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT