Mahapalika Election : क्या व्हिक्टरी है यार..! मोदींच्या मंत्र्यांची फडणवीसांना कडकडून मिठी; शिंदे, अजितदादांना न भेटताच परदेशात

Municipal election victory Maharashtra : महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाचा जल्लोष केवळ भाजपनेच साजरा केल्याचे दिसून आले.
Devendra Fadnavis in Davos
Devendra Fadnavis in DavosSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Politics : राज्यातील महापालिका निवडणुकांमधील आणि प्रामुख्याने मुंबई महापालिकेतील विजयाने भाजपमध्ये भलताच उत्साह संचारला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सत्ता भाजपला पहिल्यांदाच मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच नेत्यांनी आनंद साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल मुंबईत विजयी नगरसेवकांसोबत जल्लोष केला. या विजयाचा उत्साह परदेशातही दिसून आला.

मुख्यमंत्री फडणवीस विजयाचा जल्लोष साजरा करून मध्यरात्रीच स्वित्झर्लंडला रवाना झाले. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ते महाराष्ट्राचे नेतृत्व करतील. पण ते स्वित्झर्लंडमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या महाराष्ट्रातील विजयी पराक्रमाने आधीच पोहोचलेले केंद्रीय मंत्री भारावून गेले होते. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि राम मोहन नायडू हे झ्युरिक विमानतळावर उपस्थित होते. फडणवीस तिथे पोहोचल्यानंतर दोघांनीही त्यांना कडकडून मिठी मारली. प्रल्हाद जोशी यांनी तर ‘क्या व्हिक्टरी है यार’, असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले. या नेत्यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या विजयाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

Devendra Fadnavis in Davos
Bhai Jagtap News : आमदार भाई जगतापांवर मोठी कारवाई होणार? थेट दिल्लीतून हालचाली, 24 नगरसेवकांच्या विजयाला गालबोट?

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाचा जल्लोष मुंबईत केवळ भाजपनेच साजरा केल्याचे दिसून आले. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण या विजयाच्या आनंदात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही महायुतीतील नेते सहभागी झाल्याचे दिसले नाही. शिंदे यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते.

Devendra Fadnavis in Davos
BMC Election Result : निकालानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; बड्या नेत्यानं घातला पहिला घाव, वर्षा गायकवाड राजीनामा देणार?

विशेष म्हणजे महापालिका विजयानंतर मुंबईत झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे या तिघांनाही विजयाचा आनंद एकत्रित साजरा करता आला नाही. शिंदे, अजितदादांना न भेटताच फडणवीस परदेशात रवाना झाले. राज्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेत अनेक ठिकाणी फुटलेली महायुती या निवडणुकांमध्ये तरी एकत्रित राहणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com