Mumbai News : शिवसेना पक्ष आमदार अपात्रतेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळातून नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळत होती. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. आपल्याला कुणीही कितीही प्रभावित करण्याचा प्रयत्न केला तरी आपण नियमांनुसार निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "अनेक माध्यमातून, अनेक लोकांकडून माझ्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मला जे अपात्रतेसंबंधातला निर्णय घ्यायचा तो नियमांनुसार घेईन. कुणीही कितीही प्रभावित करण्याचा प्रयत्न जरी केला तरी कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही."
नार्वेकर म्हणाले, "काही जण म्हणतात की, माझा परदेश दौरा त्यांच्यामुळे रद्द झाला. मात्र, माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे माझा परदेश दौरा यापूर्वीच रद्द झाल होता. माझे काही पूर्व नियोजित कार्यक्रम होते. मात्र, आपण हा दौरा रद्द करायला लावला असं भासवून केविलवाणा प्रकार काही लोकांनी केला. त्यांचा हा प्रयत्न आहे की, अध्यक्षांवर दबाव आणायचा, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. नियमानुसारच कामकाज केले जाईल, अशा शब्दांत नार्वेकरांनी अप्रत्यक्षपणे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.