Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर म्हणाले; ‘ज्यांना संविधानाची माहिती नाही, त्यांच्या दबावाला...’

MLA Disqualification Case : हे काम पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल आणि जी काही मदत लागेल, ती संपूर्णपणे महाराष्ट्र सरकार करेल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मला दिला आहे.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ज्या लोकांना नियम समजत नाहीत, ज्यांना संविधानातील तरतुदींची माहिती नाही, त्यांनी केलेल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही. तसेच, विधानसभेच्या बाहेर केलेल्या आरोपांकडे लक्ष देऊन मी प्रभावित होणार नाही. त्यातून माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही आणि पडणारही नाही. संविधानातील तरतुदींचे पालन करूनच अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र अपात्रता अधिनियम १९८६ च्या नियमांचे तंतोतंत पालन करूनच मी आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. (Assembly Speaker Narwekar's reply to Thackeray group's petition)

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. दोन महिने कशासाठी, हा सर्व वेळकाढूपणा चालला आहे, असा आक्षेप घेऊन त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकर यांनी ही भूमिका मांडली आहे.

Rahul Narwekar
Income Tax Raid : खासदार राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या सूतगिरणीवर इन्कम टॅक्सचे छापे; ठाकरे गटात खळबळ

ॲड. नार्वेकर म्हणाले की, ज्या आक्षेपांना पाया नसतो. बिनबुडाचे आरोप असतात. ज्यांना संविधानाची आणि नियमांची माहिती नाही, अशा लोकांनी केलेल्या आरोपांना आपण काय उत्तर द्यायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Rahul Narwekar
Vasant More To Pawar : भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंनी डागली तोफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातील कोळीवाड्याला भेट दिली आहे. कोळीवाडीचे सुशोभीकरणाचे काम जे सुरू आहे. त्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल आणि जी काही मदत लागेल, ती संपूर्णपणे महाराष्ट्र सरकार करेल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मला दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही नार्वेकर यांनी नमूद केले.

Rahul Narwekar
Vikhe Vs Thorat : ‘समन्यायी’ पापाची जबाबदारी तुमचीच; विखेंनी डागली थोरातांवर तोफ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com