Uddhav Thackeray Shiv Sena Chief :  Sarkarnama
मुंबई

Thackeray Celebrate Gaddar Din: ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटीसा; कारण काय...?

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Vs Shinde : राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहे. राज्यात ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी गद्दार दिन साजरा केला जात असल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी बरोबर एक वर्षापूर्वी २० जून २०२२ रोजी शिवसेनेतून बंडखोरी करत १७ आमदांसोबत सुरत गाठले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर राज्यात आज शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे तीन पक्ष वेगवेगळे दिवस साजरे करणार आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण हा दिवस साजरा करु नये यासाठी कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडाची वर्षपूर्तीनिमित्त ठाकरे गटाकडून खोके दिनाचे आयोजन केले जाणार आहे.  तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकापातळीवर गद्दार दिन साजरा करण्यात आहे.

शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना आजही ठाकरे गटाकडून 'खोके गँग', 'गद्दार' म्हणून हिणवले जाते. हाच संदर्भ घेत आज महाविकास आघाडीतील ठाकरे गट 'खोके दिन' तर राष्ट्रवादी काँग्रेस 'गद्दार दिन' साजरा करत आहे. तर उद्धव ठाकरेंनी हिदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे स्वाभिमानातून बंड केल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गट आज राज्यभरात 'स्वाभिमान दिन' साजरा करणार आहे. यामुळे मात्र राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापणार आहे.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उद्या गद्दार दिवस आहे. तो साजरा केला पाहिजे, असे आवाहन केले होते. दरम्यान, मुंबईतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत. गद्दार दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत. यामुळे ठाकरे-शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT