Vinod Tawade
Vinod Tawade Sarkarnama
मुंबई

Vinod Tawade : आता ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र; तावडेंना राज्याच्या राजकारणात नाही स्वारस्य, म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

BJP Political News : २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी नाकारली, चार वर्षे ते राज्याच्या राजकारणातून बाहेर राहिले. त्यामुळे आता त्यांचे राजकारण संपले अशी चर्चा राज्यात झाली, अशा विनोद तावडे यांचे राजकारणात 'कमबॅक' झाले. भाजपने त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड केली. त्यानंतर तावडे यांच्यावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी दिली. राष्ट्रीय पातळीवर काम सुरू केल्यानंतर आता तावडे राज्याच्या राजकारणात स्वारस्य नसल्याचे म्हणत आहेत. राष्ट्रीय पातळीवर काम करताना राजकीय दृष्टीकोन व्यापक होत असून तेथेच काम करणार असल्याचेही तावडे म्हणाले.

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात गरज असेल तरच येऊच मात्र, राष्ट्रीय राजकारणात रमल्यचे सांगितले. तावडे म्हणाले, "केंद्रीय स्तरावर काम करताना जे शिकायला मिळते ते राज्यात मिळत नाही. राष्ट्रीय पातळीवर काम करताना राजकीय दृष्टीकोन व्यापक होतो. उत्तर प्रदेशची जबाबदारी होती त्यावेळी तेथील ४०२ विधानसभांचे राजकीय, सामाजिक विश्लेषण केले. त्यानुसार विविध विधानसभा मतदारसंघाच्या बांधणीसाठी 'स्ट्रॅटेजी' राबविली. त्यातून देशात मोठे असलेले उत्तर प्रदेश (UP) राज्य समजून घेता आले. त्या पद्धतीचा देशात इतर ठिकाणी राबविण्यासाठी मदत होईल. राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी आहे. त्यामुळे आता ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र! पुन्हा राज्यात येण्याचा माझा मानस नाही."

भाजपचे नेते दिवगंत प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्यानंतर एका मराठी माणसाला देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचेही तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, "एक मराठी माणूस देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतोय, हाच माझ्यासाठी वेगळा आनंद आहे. प्रमोद महाजनांनंतर ती जबाबदारी माझ्यावर आल्याची अभिमानही आहे. राष्ट्रपातळीवर काम करताना गरज असेल त्यावेळी सहकार्यासाठी राज्यात येणारच आहे. मात्र माझे राजकारण केंद्रातच असेल."

२०१९ मध्ये उमेदवारी मिळाली नसल्याने राज्यात भाजपचे (Maharashtra BJP) दोन गट कार्यरत असल्याची चर्चा झाली, त्यात काही तथ्य नसल्याचे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "भाजपमध्ये दोन गट आहेत, या सोशल मीडियावरील चर्चांमध्ये काही तथ्य नाही. महाराष्ट्रात भाजप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) व इतर नेत्यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यांचे काम चांगले सुरू आहे. राज्यात अनेक वर्षे आम्ही एकत्र राहुनच काम केले. आता राष्ट्रीय पातळीवरच काम करायचे आहे. राज्यात येण्यात अजिबात रस नाही. गरज पडली तर मुंबईच्या महापालिकेसाठीही वेळ देईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT