Devendra Fadanvis; एकलहरे विद्युत केंद्राचे जुने संच पुनर्विकसीत करणार

छगन भुजबळ यांच्या लक्षवेधी सूचनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहीती दिली.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : (Mumbai) नवीन वीज (Power Policy) धोरणानुसार शासनाने केलेल्या एमओडी नुसार अतिरिक्त दराने वीज खरेदी करू शकत नाही. त्यामुळे नव्याने कुठलाही प्रकल्प विकसित केला जाणार नाही. मात्र एकलहरे (NTPS Nashik) येथील जुने संच पुनर्विकसीत करण्यात येऊन प्रकल्प सुरु ठेवण्यात येईल, येथील कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तरात दिली. (Devendra Fadanvis assures On Nashik NTPS plant will renew)

Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal; धक्कादायक, भूमाफीयांनी वनजमिनींची परस्पर विक्री केली.

धोरणाचा पुनर्विचार करून एकलहरे येथील औष्णिक विद्युक्त केंद्रातील नूतन संच विकसित करण्यात यावे, या विषयावर आमदार सरोज आहिरे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांसह विविध सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

Devendra Fadanvis
Uddhav Thackeray News: शिवसेनेने दादा भुसे यांची मतदारसंघातच केली नाकेबंदी!

एकलहरे येथील ६६० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प मंजूर आहे. मात्र हा प्रकल्प रखडल्याने आमदार सरोज आहिरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, एकलहरे येथे २१० मेगावॅटच्या तीन संच कार्यन्वित आहे. त्याच आयुर्मान संपत आले आहे. त्यामुळे सन २०११ साली ६६० मेगावॅट प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. हे नवीन नाही, जे जुने आहेत त्या ठिकाणी नवीन संच बसावयाचे आहे. जसजसे संच जुने होत जातील तशी त्याची कार्यक्षमता कमी होत जाणार आहे हे खरे आहे.

Devendra Fadanvis
Sanjay Raut; शिंदे गटाला हादरा, मंत्री दादा भुसेंवर 157 कोटींच्या लुटीचा आरोप?

त्यामुळे विजेचा दर वाढीव होणार आहे. मात्र सन २०११ साली ६६० मेगावॅट एकलहरे येथे मंजुर करण्यात आला. मागील काळात हा प्रकल्प नाशिक ऐवजी डहाणू येथे प्रस्तावित करण्यात येत आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, कुठलाही नवीन प्रकल्प काढायचा ठरला तर त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र एकलहरे येथे मुबलक जागा आहे, स्वतंत्र रेल्वे लाईन, उन्हाळ्यातही या ठिकाणी वीज निर्मिती करण्याची क्षमता, मुबलक पाणी, कुशल कामगार, कामगार वसाहत, दर्जेदार उत्पादन करण्याची क्षमता हे सर्व उपलब्ध आहे. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करून एकलहरे येथील विद्युक्त केंद्रातील नूतन संच विकसित करण्यात यावे. येथील कामगाराचा रोजगार हिरावला जाऊ नये. यासाठी शासन येथील संच पुनर्विकसित करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी उत्तरात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याठिकाणी असलेले जुने संच बंद न करता ते पुनर्विकासित करण्यात येणार आहे. राज्यातील विजेची क्षमता वाढविण्यासाठी हे सुरूच ठेवले जाणार आहे. मात्र शासनाने जे नवीन धोरण आखले आहे. त्यानुसार उत्पादन खर्च कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Devendra Fadanvis
Palghar News: सरकारी कार्यालयांचा दलालांचा विळखा सोडवू!

ज्याठिकाणी वाहतुकीसाठी अधिक सुलभ व कमी खर्च, कोळश्याची उपलब्धता तसेच आवश्यक त्या सुविधा सहज उपलब्ध असतील अशा ठिकाणी विजेचे प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. नाशिकच्या एकलहरे प्रकल्प बंद न करता या प्रकल्पाचा पुनर्विकास केला जाईल. याठिकाणी ग्रीड स्थिरतेसाठी पंप स्टोअरेज करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नाशिकमध्ये ती क्षमता असून यासाठी शासनाने कामकाज सुरु केले आहे. शासन एमओडीनुसार अधिक किंमतीने वीज खरेदी करू शकत नाही. त्यामुळे याठिकाणी आहे तोच प्रकल्प पुनर्विकसीत करण्यात येईल नवीन कुठलाही प्रकल्प उभा राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com