Odisha Train Accident :
Odisha Train Accident : Sarkarnama
मुंबई

Odisha Train Accident : जबाबदारीपासून पळत नाही, आम्ही काम करतोय; रेल्वे अपघातावर केंद्रीय मंत्री म्हणाले..

शर्मिला वाळुंज

Mumbai News : केंद्रीय क्रिडा मंत्री व भाजप नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकींच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने भाजपच्या विविध मंत्र्यांचा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्या दृष्टीकोनातून मंत्री अनुराग ठाकूर आज उल्हासनगरमध्ये दाखल आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी ओडीशा येथे झालेल्या अपघातावरही प्रतिक्रिया दिली आहे.

ओडीशा येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघातावर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. याबाबत महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "रेल्वे अपघात ही दुःखद घटना असून यावर कुणीही राजकारण करू नये. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्या, त्यांच्या मनात ममता अजिबात नाही. ज्यांच्या राज्यात महिलांवर बलात्कार होतात, लोकांवर बॉम्ब फेकले जातता. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या, केंद्रात मंत्री होत्या, त्यांना इतकं तरी माहीत हवं की ही आकडेवारी राज्य सरकार देतं, केंद्र सरकार देत नाही. आणि त्या राज्यात भाजपचं सरकार नाही. या प्रसंगातही विरोधी पक्ष राजकारणच करणार आहे का? असे ठाकूर म्हणाले.

ठाकूर म्हणाले, "विरोधी पक्षांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे उरले नाहीत का? ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी मदतकार्य सुरू केलं. प्रधानमंत्री स्वतः तिथे गेले. आम्ही कोणत्याही राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही, अशा प्रसंगात सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. यांनी तर कोरोना लसीवरही प्रश्न उपस्थित करत भारतीय लसी घेऊ नका असं सांगितलं. ही कोणती विचारसरणी आहे? नेहमी विष कालवण्याचं, भ्रम, भीती निर्माण करण्याचं काम करणार का? ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, जे जखमी झाले आहेत, त्यांच्यासोबत उभं राहण्याची आहे, असे ही ठाकूर यांनी विरोधकांना सुनावले.

"जबाबदारीपासून कोणीही पळत नाहीये. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय. रेल्वेमंत्री स्वतः तिथे गेले आणि रात्रभर बसून आपली जबाबदारी पार पाडली. स्वतः पंतप्रधान तिथे गेले. अनेक मंत्री गेले. केंद्राचे सगळे मोठे नेते राज्य सरकारच्या सोबत तिथे गेले आणि बचावकार्यात सहभाग घेतला, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

जखमींपैखी अनेकांना डिस्चार्ज :

दरम्यान ओडीशा बालासोर आणि इतर स्थानिक रुग्णालयात सुरुवातीला दाखल झालेल्या अनेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कटक, भुवनेश्वर आणि कोलकाता यासह इतरही काही रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश मृतदेह भुवनेश्वरमधील केंद्रात हलवण्यात आले आहेत.

कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी दि. २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीला धडकली आणि तिचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. हा खूप भीषण अपघात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT