Anurag Thakur News : ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई होणार का? ; केंद्रीय मंत्री म्हणाले...

Anurag Thakur on brijbhushan singh : मी वैयक्तिक जाऊन त्यांना भेटलो, कमिटी स्थापन केली..
Anurag Thakur News :
Anurag Thakur News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय क्रिडा मंत्री व भाजप नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकींच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने भाजपच्या विविध मंत्र्यांचा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्या दृष्टीकोनातून मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज उल्हासनगरमध्ये दाखल आले होते.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले.

भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. यावेळी ठाकूर यांनी ब्रिजभूषण सिंग यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

यावेळी पत्रकार परिषेदेत मंत्री अनुराग ठाकूर यांना ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ठाकूर म्हणाले. "२०१४ च्या आधी खेळांसाठी जितकं बजेट होतं, त्याच्या तिप्पट बजेट आता केलं आहे. खेळाडूंसाठी अनेक चांगल्या सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडूंनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर सगळ्यात आधी आमच्या सरकारने पावलं उचलली."

Anurag Thakur News :
AIMIM March Against Police News : पोलिस अत्याचाराच्या विरोधात इम्तियाज जलील काढणार मोर्चा..

ठाकूर पुढे म्हणाले, "मी वैयक्तिक जाऊन त्यांना भेटलो, कमिटी स्थापन केली, कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर सब-कमिटी तयार केली, पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास केला. सुप्रीम कोर्टातही प्रकरण गेलं आहे. देशातला कायदा आपलं काम करतोय. तपास पूर्णपणे नि:पक्षपातीपणे होईल. चार्जशीट दाखल होईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल," असे स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले आहे.

Anurag Thakur News :
Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख, बघा Gopichand Padalkar काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama Video

यावेळी त्यांना भाजप - शिवसेना युतीत शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर अनुराग ठाकूर म्हणाले, "हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. ती वेळ २०२४ मध्ये येईल, आत्ता ती वेळ नाही. जर आम्ही सगळी कामं आणि विकास एकत्र करत आहोत, तर हा निर्णय सुद्धा एकत्र बसून घेतला जाईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com