shrikant shinde, omi kalani
shrikant shinde, omi kalani  sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde News : ओमी कलानी - खासदार शिंदे यांच्या 'दोस्ती का गठबंधन'ची स्टिकर्स झळकली !

सरकारनामा ब्यूरो

Ulhasnagar news : ओमी कलानी यांनी महायुतीतील कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे शिवसेना वगळून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, उल्हासनगरातील टीम ओमी कलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या 'दोस्ती का गठबंधन'ची स्टिकर्स झळकली आहेत. या स्टिकर्सचे अनावरण करतानाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याची प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तीन चार दिवसांपूर्वी कलानी महलवर झालेल्या टीम ओमी कलानीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दोस्तीच्या भावनेतून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या कलानी परिवाराने डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. तेव्हा ओमी कलानी हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असल्याची शाबासकी डॉ.शिंदे यांनी दिली होती. याच मेळाव्यात डम्पिंग ग्राउंड, भूमिगत वाहनतळ, दफनभूमी, धोकादायक इमारत, उत्तर भारतीय भवन, म्हारळ गाव ते वडोल गाव उन्नत महामार्ग अश्या सहा समस्या सोडविण्यासंबंधी गॅरंटीची मागणी टीओकेकडून मनोज लासी यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पेट्रोल पंपावर बॅनर लावून जे गॅरंटी देतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही,आमचा विश्वास फक्त खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याची टीका मोदी यांचे नाव न घेता टीओके प्रवक्ता कमलेश निकम यांनी केली होती.

याबाबतची नाराजी महायुतीतील भाजप, रिपाइं आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी व्यक्त करीत महायुतीच्या जव्हार हॉटेल येथे पार पडलेल्या समन्वय बैठकीत टीओकेचा बॉयकॉट केला होता. यावरून मासमीडियावर भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी आमनेसामने आले होते.

दरम्यान, टीओकेच्या मेळाव्याला काही दिवस झाले असतानाच टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या 'दोस्ती का गठबंधन'ची 5 हजार स्टिकर्स झळकली आहेत. कारच्या मागील काचेवर ही स्टिकर्स चिकटवण्यात येणार आहेत. त्यावर डॉ. श्रीकांत शिंदे,ओमी कलानी या दोघांची फोटो असून धनुष्यबाण ही निशाणी दिसत आहे.

डॉ. शिंदे यांनी या स्टिकर्सचे अनावरण त्यांच्या डोंबिवली (Dombivli) निवासस्थानासमोर केले आहे. या वेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, टीओकेचे कमलेश निकम,मनोज लासी, नरेंद्रकुमारी ठाकूर,अजित माखिजानी,संतोष पांडे, अवि पंजाबी, सुंदर मुदलियार उपस्थित होते.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT