Lok Sabha Election 2024 News : उत्तर पश्चिम मुंबईवरून महायुतीत सस्पेन्स; 'या' माजी मंत्र्याने दर्शवली निवडणूक लढण्याची तयारी

Political News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार ठरत नसल्याने या ठिकाणी काळ निवडणूक लढणार याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.
Amol Kirtikar
Amol Kirtikar Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास सव्वा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. तरी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. महायुतीच्या सहा जागेवरील तिढा सुटत नसल्याने ऐन उन्हाळ्यातच राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच आता उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य) मुंबईवरून महायुतीमध्ये सस्पेन्स पाहावयास मिळत आहे. या जागेवरून भाजप (BJp) व शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर (Amol kirtikar) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार ठरत नसल्याने या ठिकाणी काळ निवडणूक लढणार याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे. ( Lok Sabha Election 2024 News )

Amol Kirtikar
Uttam Jankar News : उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर पलटवार; 'सुपारी फुटली, हळद लागली आता...'

शिवसेना शिंदे गटाकडून या उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. दीपक सावंत यांनी या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. अन्य उमेदवार नसेल, तर आपण तयार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंना सांगितल्याचे सावंत म्हणाले.

येत्या काळात प्रचारासाठी फार कमी दिवस उरले असून, संधी मिळाल्यास तिचा योग्य वापर करु, असा विश्वासही डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवले जाणे अपेक्षित होते, परंतु त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकणी भाजप आणि मनसेच्या आक्षेपानंतर शिंदेंनी आपला निर्णय बदलला असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठी कलाकारांच्या पर्यायाची चाचपणी

राजकीय निरीक्षकांच्या माहितीनुसार शिंदे सेनेने किमान पाच-सहा पर्यायांची चाचपणी केली, परंतु अद्याप त्यांना उमेदवार निश्चित करता आलेला नाही. अभिनेता गोविंदा आणि शरद पोंक्षे यांच्यासह मराठी कलाकारांचे पर्याय तपासून पाहिले. मात्र नाव निश्चित करण्यात आले नसल्याचे समजते.

R

Amol Kirtikar
Gajanan Kirtikar and Amol Kirtikar : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात किर्तीकर पिता-पुत्र आमनेसामने?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com