Aditya Thackeray And Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे बुधवारी हैद्राबाद दौऱ्यावर होते. येथे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक गोप्यस्फोट केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, जेलमध्ये जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्याचा दावा आदित्य यांनी केला. भाजममध्ये (BJP) गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे शिंदे म्हणाले होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदित्य ठाकरेंना उत्तर दिले होते. शिंदे म्हणाले होते, ''अरे त्या जाऊ द्या रे... आदित्यचा विषय तो लहान आहे अजून,'' असे सांगत मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, 20 मेला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना 'वर्षा' बंगल्यावर बोलावले होते. जे काही कानावर येत आहे, ते योग्य आहे का? असे उद्धव ठाकरे यांनी विचारले होते. त्यावेळी शिंदे रडले होते, भाजपसोबत जाण्याविषयी बोलेले होते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटनंतर शिंदे गटा चांगला आक्रमक झाला आहे. त्यांनी आदित्य यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावरुन ठाकरे गटानेही जोरदार उत्तर दिले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार वाद रंगला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.