Uddhav Thackeray News : खेड, मालेगाव झाले आता ठाण्याचा नंबर; 'मातोश्री'वर खलबतं : ठाकरे नवा डाव टाकणार...

Anand Paranjape met Uddhav Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली.
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Anand Paranjape
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Anand ParanjapeSarkarnama
Published on
Updated on

Thane News: ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या विविध घटनांनी ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील घडामोडींवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Anand Paranjape
MLA Deshmukh News : ठाकरेंचे फायरब्रॅंड नेते भडकले; म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

आनंद परांजपे यांनी काही महिन्यापूर्वी शिवसेनेला (Shivsena) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी 'मातोश्री'वर जाऊन ठाकरेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागे नेमके काय राजकारण आहे, याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे पुढील राजकारण आखत असताना मुख्यमंत्री शिंदे यांना ठाण्यात गुंतवून ठेवण्यासाठी ठाकरे रणनिती आखत असल्याची चर्चा आहे.

ठाणे पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आता शिंदे यांच्या बंडामुळे ठाण्यात आपली ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिंदेंना घेरण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते. ठाण्यात खासदार राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या माध्यमातून ठाकरे गट टिकून आहे. मात्र, त्यांच्या मदतीसाठी काही नवे शिलेदार शोधण्याची तयारी ठाकरे यांनी सुरु केली आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड नियमीत उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिसतात. त्यानंतर आता आनंद परांजपे यांनीही ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चा होत आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Anand Paranjape
Sharad Pawar Reaction: अजितदादा भाजपमध्ये जाणार ? दमानियांच्या टि्वटवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया..म्हणाले..

परांजपे यांनी भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सांगितले होते. की आम्ही दोघेही उद्धव ठाकरे यांना भेटालया जाणार होतो. मात्र, मला काम असल्यामुळे जाता आले नाही, असे सांगत परांजपे यांच्या भेटीत काहीही गुप्त नव्हते असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात ठाण्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दौरेही वाढले आहेत.

ठाण्यातील रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच या घटनेनंतर ठाकरे गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान देत ठाण्यातून लढणार आणि जिंकणार असे म्हटले होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Anand Paranjape
MVA Rally In Nagpur : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर नागपुरातील आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेला पोलिसांची परवानगी; पण....

ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी तयारी करत असल्याचे समजते. ठाण्यासह कल्याण लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) जोरदार मोर्चबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे येथेही शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी ठाकरे गटाला तगडा उमेदवार पाहिजे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट होती का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात भाजपचे (BJP) नेते अद्वैत हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तर योगेश कदम यांच्या खोपोली मतदार संघात, संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याच पद्धतीने ठाण्यात राजकारण होणार का? असा सवाल विचारला जात आहे. की ठाकरे गट आणि राष्ट्रवादी मिळून शिंदेपुढे आव्हान उभे करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com