Dombivali Sarkarnama
मुंबई

Deepotsav : राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येस डोंबिवलीत साजरा झाला दीपोत्सवात!

Shrikant Shinde and Ravindra Chavan : 1 लाख 1 हजार 111 दिवे उजळवण्यात आले; श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये मनोमिलन?

Bhagyashree Pradhan

Dombivali News : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येस खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला खासदारांसह आमदार रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. यावेळी या दोघांमध्येही चांगला मेळ पाहिला मिळाला.

1 लाख 1 हजार 111 दिवे उजळवण्यात आले. दिव्यांच्या नक्षीने राम मंदिर तसेच खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे(Shrikant Shinde) कल्याण लोकसभा मतदारसंघ असे रेखाटण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आमदार रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी विशेष उपस्थिती लावलेली पाहिला मिळाली. इतकेच नव्हे तर यावेळी खासदारांनी महाआरती करताना आणि भाषण करताना आमदार रवींद्र चव्हाण यांना विशेष मान दिल्याचे पाहिला मिळाले. या दोघांनीही झालेल्या आतषबाजीचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी या दोघांमध्ये चर्चा देखील रंगलेली पाहिला मिळाली. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्येही धुसफूस सुरू असल्याचे पाहिला मिळाले होते. मात्र या कार्यक्रमात एकत्र पाहिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाषण करताना श्रीराम मंदिर हे राष्ट्र मंदिर म्हणून पाहिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणापलीकडे जाऊन काम करतात. असे वक्तव्य केले.

तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांच्यामुळे हा उत्सव आज साजरा करायला मिळत असल्याचे सांगत बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यानिमित्त जय्य त तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची सर्वांनाच इच्छा आहे.

तर, देशभरातीलच नव्हेतर जगभरातून व्हीव्हीआयपी मंडळींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशावेळी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच अयोध्येला जाणार नसून, संपूर्ण मंत्रिमंडळासह महायुतीचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनाही नेणार आहेत. त्यांनी याबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT