Shrikant Shinde : कल्याणमध्ये शिंदेंची भाजपवर मात; लोकसभा निवडणुकीपूर्वीच नेमकं काय घडलं ?

Kalyan Loksabha, BJP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचा उत्सवात उत्स्फुर्त सहभाग
Ram Temple Program in Kalyan
Ram Temple Program in KalyanSarkarnama

Ayodhya Ram Temple Consecration : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप मंत्री, खासदार, आमदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अनेक कार्यक्रम दिले आहेत. तसेच या सण साजरा करण्याचे आवाहनही देशवाशीयांना केले आहे. त्यानुसार भाजप कामाला लागली आहे. कल्याणमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. येथे राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम राबवण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भाजपवर वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे.

राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदोत्सव केला जात असतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघातही खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यातर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिंदेंच्या तुलनेत या राम उत्सवात मात्र भाजप आमदार आणि खासदारांसह पदाधिकाऱ्यांचा उत्साह कमी झालेला दिसत आहे. दरम्यान, कल्याण लोकसभेवर भाजपनेही दावा ठोकला होता. यावरून शिवेसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. आता राममंदिराच्या कार्यक्रमात शिवसेनेने बाजी मारल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Ram Temple Program in Kalyan
Manoj Jarange Morcha: मनोज जरांगेंच्या पदयात्रेत गोदाकाठच्या 123 गावांची ताकद दिसली...

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) आवाहनास प्रतिसाद देत खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याणमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात एक लाख ११ हजार १११ दिव्यांमधून प्रभू श्री रामाचे चित्र साकारला जाणार आहे. महाआरतीसह मतदारसंघात नऊ ठिकाणी आकर्षक रोषणाई केली आहे. कल्याण पश्चिम शहर शाखेच्या वतीने शनिवारी कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती आणि दुर्गाडी किल्ल्यावर दिपोत्सव पार पडला. यावेळी खासदार शिंदे यांची पत्नी वृषाली यांच्यासह सहभागी झाले होते.

Ram Temple Program in Kalyan
Congress Politics : आघाडीत ठिणगी! पूर्व विदर्भातील सर्व जागांवर काँग्रेसचा दावा; घटक पक्षांची भूमिका काय?

दरम्यान, कल्याणमधील भाजप (BJP) मात्र कार्यक्रमांच्या नियोजनात मागे पडलेला दिसून येत आहे. भाजपच्या वतीने केवळ जिमखाना येथे एक मंदिर उभारले आहे. तेथे गीतरामायण उपक्रमाचे आयोजन आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे करण्यात आले. काही ठिकाणी बॅनर्स देखील झळकले आहेत. मात्र खासदार शिंदे यांनी केलेल्या कार्यक्रमांच्या तुलनेत आमदार मागे असल्याची चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे ही निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने शिंदे गटाची शिवसेना अधिक पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे. याच कारणासाठी भाजप कार्यक्रमाच्या नियोजनात मागे आहे का, असा प्रश्नही विचारला जात आहे. असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक मात्र या संपूर्ण उत्सवात हिरहिरीने सहभागी होताना दिसून येत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Ram Temple Program in Kalyan
Ayodhya Ram Temple : राम मंदिरावरून सांगलीत स्पर्धा, विश्वजीत कदम-सुरेश खाडे आमनेसामने

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com