Sanjay Pande
Sanjay Pande sarkarnama
मुंबई

निवृत्तीनंतर तिसऱ्याच दिवशी संजय पांडेंना ईडीचे चौकशीसाठी समन्स

सरकारनामा ब्यूरो

पुणे : तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून (Mumbai Police Commissioner) निवृत्त झालेले संजय पांडे (Sanjay Pande) यांना ईडीने समन्स बजावले आहे.येत्या मंगळवारी (ता.५) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पांडे यांना देण्यात आले आहेत.

चित्रा रामकृष्णन प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी पांडे यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पांडे पोलीस महासंचालक होते तेव्हा पांडे यांनी परमबीरसिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव आणला होता, असे सांगितले जात आहे.

राज्यात सत्ताबदल होत असताना पांडे हेदेखील सेवानिवृत्त झाले. त्यामुळे निवृत्त पांडे यांची चौकशी तातडीने सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात आधिकारी म्हणून काम न करता आघाडी सरकारच्या बाजूने काम केल्याचा राज्यातील भाजपा नेत्यांचा व केंद्रातील मंत्र्यांचा पांडे यांच्यावर मुख्य आक्षेप आहे.

पांडे यांच्या काळात वाझे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात कोणतीही बाजू न घेता नियमाप्रमाणे काम न करता तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचविण्याचा प्रयत्न पांडे यांनी केल्याचे बोलले जातेया प्रकरणात मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप पांडे यांच्यावर यापूर्वी करण्यात आला आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT