'आरे' कारशेडला काही प्रमाणातील विरोध हा स्पॉन्सर्ड : फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis : पर्यावरणवाद्यांचा आम्ही सन्मान करतो. मात्र २५ टक्के प्रकल्प हा पूर्ण झाला आहे.
BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News Sarkarnama

Aarey Agitation : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता. 3 जुलै) आरे'मधील कारशेडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून आरेमधील होणारा विरोध हा काही प्रमाणात स्पॉन्सर्ड असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पर्यावरणवाद्यांचा आम्ही सन्मान करतो. मात्र २५ टक्के प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. झाडे कापलेली असून आता आणखी झाडे कापण्याची आवश्यकता नाही. आता जर काम सुरु केले तर, वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, असे मत फडणवीसांनी व्यक्त केला. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News)

BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
`ईडीच्या धाकाने आमदार आमच्याकडे आलेले नाहीत...अन्यथा राऊतही आले असते!`

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit thackeray) यांनी आरेतील मेट्रो कारशेडला विरोध केला होता. मात्र, फडणवीस हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ते म्हणाले की, काही छद्म आणि स्पॉन्सर्ड पर्यावरणवादी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि हरीत लवादात हरल्यानंतरही काही पर्यावरणवादी याला विरोध करत आहेत. मात्र अशा विरोधाला काही अर्थ नसून चांगल्या पर्यावरणवाद्यांशी आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू, असे फडवणवीस म्हणाले.

BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
बंडखोरांना नेणाऱ्या बसच्या दारात स्वतः संजय कुटे उभे राहिले...

फडणवीस म्हणाले, आरेतील झाडे कापलेली असल्याने तेथील झाडे पुन्हा कापायची गरज नाही. मात्र, काही लोकांना याची माहिती नसल्यानेच ते विरोध करत आहेत. आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. मात्र तरी सुद्धा आम्ही पर्यावरणवाद्यांचा सन्मान करतो. त्यांचं म्हणणं मांडण्याचाही त्यांना अधिकार आहे. मात्र, हरित लवादाने आणि सर्वोच्च न्यायालायनेही परवानगी दिल्याने प्रकल्प सुरू झालेला आहे. तसेच, या प्रकल्पाचे 25 टक्के कामही पूर्ण झाले. त्यामुळे त्या ठिकाणी काम सुरू केलं तर पुढच्या एक वर्षात काम पूर्ण होईल आणि मेट्रो सुरू होईल, असे फडणवीस म्हणाले. तर मागच्या सरकारचे घेतलेले कोणतेही निर्णय सरसकट बदलणार नसून ज्यामध्ये चुका आहेत आणि ज्या निर्णयातून भ्रष्टाचाराचा वास येतो आणि जे निर्णय चांगल्या हेतूने घेतले नाही, ते निर्णय अभ्यास करूनच रद्द करू, असेही त्यांनी स्पष्ट केले

BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधी पक्षाची जोरदार बॅटिंग

मेट्रो मुंबईचा अधिकार असून मेट्रो नसल्याने मुंबई प्रदूषणामुळे रोज होरपळत होत असून मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. हे पाप आम्ही चालू देणार नाही. कारशेड हे कांजूरमार्गला नेली तर चार वर्ष लागतील. 10 ते 15 हजार कोटी खर्च होईल. यामुळे नाकापेक्षा मोती जड होईल. या प्रकरणात कोर्टात केसही आहे. आम्ही पर्यावरणपूरक निर्णय घेणार आहोत. मात्र, आंदोलन करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहीत नाही, अशी टीका त्यांनी केली.

BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
शिंदे सरकारला सळो की पळो करणारा नेता शरद पवार ठरविणार !

दरम्यान, अमरावतीच्या घटनेबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण गंभीर असून कोल्हे यांना निष्ठूरपणे मारलं आहे. ही क्रुरता असून याप्रकरणी आरोपीला पकडलं आहे. मास्टरमाईंडलाही पकडलं आहे. याबाबत एनआयए चौकशी करत असून या प्रकरणात बाहेरचं काही कनेक्शन आहे का हे देखील बघितलं जात आहे. तसेच आज झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, आज राहुल नार्वेकर यांच्या रुपाने विधीज्ञ असणारा सर्वात युवा तरुण अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला मिळाला आहे. हा देशात विक्रम झाला आहे. आजच्या निवडणुकीत 164 सदस्यांनी आम्हाला मतदान केलं. यामुळे उद्या होणारा विश्वास ठरावही आम्ही जिंकू,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com