Narayan Rane, Ashok Chavan  Sarkaranama
मुंबई

Ashok Chavan : एकदा CM अन् आता राज्यसभेची संधी हुकली, तरीही राणेंनी अशोक चव्हाणांना केला फोन

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai News : 'केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मुख्यमंत्रिपदी नाव चर्चेत असताना मी सीएम झालो. त्यांचं राज्यसभेसाठी नाव चर्चेत असताना मला उमेदवारी मिळाली. हा योगायोग आहे. आमच्या दोघांचे स्टार कुठे तरी मिसमॅच होतात. पण, दोन दिवसांपूर्वी त्यांचा मला फोन आला. बऱ्याच वर्षांनंतर फोन आला. पक्षात आल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. माझं येणं आणि त्यांची राज्यसभा जाणं याचा काही संबंध नाही', असे मत अशोक चव्हाण यांनी केला. एका मुलाखतीत चव्हाण यांनी राणे यांच्याबरोबरच्या संबंधावर एक नजर टाकली आहे.

विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यानंतर काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. त्यांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभा राव यांच्याशी उत्तम राजकीय संबंध प्रस्थापित करत दिल्लीत पक्षश्रेष्ठीपर्यंत आपल्या नावाचं जोरदार लॉबिंग केलं होतं. पण, अखेर राणे यांचा पत्ता कट होत अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले.

यामुळे प्रचंड नाराज झालेल्या राणे यांनी चव्हाण तसेच पक्ष नेतृत्वावर तोंडसुख घेतले होते. आजही त्यांच्या या काँग्रेसवरील घणाघाती टीकेची चर्चा होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये कधी राणे यांचे मन रमले नाही आणि त्यांनी भाजपचा रस्त्ता धरला.

या प्रसंगाची चव्हाण यांना आठवण करून दिली असता, त्यांनी आमचं कुठेतरी जमत नसल्याचं बोलून दाखवलं. पण, त्यांचा आता फोन आला हे खूप महत्त्वाचं आहे, असेही ते म्हणाले. भाजपकडून तातडीने राज्यसभा उमेदवारी का दिली. यावर ते सांगतात, 'मला राज्यसभेवर पाठवण्याचं ठरलं होतं असं म्हणणार नाही. त्यांना वाटलं असेल. माझ्या अनुभवाचा उपयोग राज्यसभेत व्हावा, असे त्यांना वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी मला राज्यसभा दिली असावी. मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससाठी काम करत होतो.

दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. मी शेवटच्या दिवशी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. तेव्हा बैठक घेतली आणि संध्याकाळी गाडी पकडून मुंबईत आलो. मला राज्यसभेवर घेतलं याचा अर्थच असं आहे, की मी पक्षाला अधिक वेळ द्यावा. मराठवाड्यात प्रचार करावा असं त्यांना अपेक्षित आहे. त्यात काही गैर नाही'.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस (Congress) सोडण्याविषयी काय सांगाल यावर चव्हाण सांगतात, 'मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि चेन्नथीला यांना मी सांगितलं होतं. वैचारिक भूमिका मांडली आहे. असे अचानक आलो नाही. व्यथा मांडली आहे. पण पक्ष सोडतोय असे सांगितलं नाही”, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 'मी एकाही आमदाराला सोबत या म्हणून सांगितलं नाही. एकाही आमदाराशी चर्चा केली नाही. एकाही आमदारांना पक्ष सोडून या असे म्हटलं नाही. करायचं असतं तर करता आलं असतं. पण नाही केलं.'

'काँग्रेस सत्तेत असतानाही मी दहा वर्षे सत्तेच्या बाहेर होतो. पदावर नव्हतो. नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळाले. सत्ता हा हेतू नाही. सत्तेने फरक पडतोच. लोकांना कामं हवी आहेत. तुम्ही सत्तेत आहात की नाही याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असताना लोकांचं काम करता येतं. देशपातळीवर मोदींबाबत वलंय आहे. ते काम करत आहेत', असे शेवटी अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT