Maratha Reservation : तुम्ही माझ्याच घरासमोर कसे आलात? प्रणिती शिंदे मराठा आंदोलकांवर भडकल्या...

Praniti Shinde was angry with the Maratha protesters : आज सोलापुरात सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा घेतला होता निर्णय.
MLA Praniti Shinde
MLA Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत आहे. राज्य सरकार जरांगे यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, त्याच्या निषेधार्थ आज मराठा आंदोलकांच्या वतीने आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलकांना सुनावले. तुम्ही इतर कोणत्याही आमदाराच्या घरासमोर आंदोलन केले नाही. तुम्ही माझ्या घरासमोरच कसे आलात, असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत असून, राज्य सरकार त्याकडे लक्ष देताना दिसून येत नाही, त्यामुळे संतापलेल्या मराठा समाजाने आज सोलापुरात सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मराठा समाजाच्या वतीने काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत होते. पण, प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होत्या, त्यामुळे त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Praniti Shinde
Dharashiv Loksabha : ठाकरेंच्या शिलेदाराचा बंदोबस्त करण्यासाठी शिंदे, अजितदादानंतर फडणवीसही उतरले मैदानात !

प्रणिती शिंदे यांनी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. इतर कुठल्याही आमदारांच्या घरासमोर तुम्ही गेले नाहीत. माझ्याच घरासमोर तुम्ही कसे आलात, असा प्रश्न आंदोलकांना विचारला. आंदोलकांनीही आम्ही भाजप आमदाराच्या घरासमोर आंदोलन केले आहे, असे प्रणिती शिंदे यांना सुनावले. त्यावेळी आंदोलक चांगलेच संतप्त झाले होते.

येत्या 20 तारखेच्या अधिवेशनात आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडणार आहोत. तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला धारेवर धरणार असल्याचे शिंदे यांनी आंदोलकांना सांगितले. मात्र, त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आंदोलकही चांगलेच भडकले होते. त्यांनी मराठा समाजाला 50% मधून ओबीसी आरक्षण देण्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे का, असा सवालही विचारला त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

R

MLA Praniti Shinde
Ravikant Tupkar News : रविकांत तुपकरांच्या अटकेच्या निर्णयावर आता २१ फेब्रुवारीला फैसला !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com