Eknath Shinde during his Delhi visit discussing political strategies, highlighting rising tension in Maharashtra politics. Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगरला' बळ : संजय जाधवांची अमित शहांसोबत खलबत; नागेश पाटील अन् संजय देशमुख बड्या नेत्याकडे जेवायला

Shivsena Operation Tiger : ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी नुकतंच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, ही भेट पुढील वर्षी होणाऱ्या देशातील जनगणना कार्यक्रमात भटके विमुक्त समाज आणि आदिवासी यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याच्या मागणीसाठी घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, तरीही अनेकांना जाधव यांच्या भेटीमागे काही मोठं राजकारण शिजत असल्याचा संशय आहे.

Jagdish Patil

Shivsena News, 02 Apr : राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर डिप्लोमसीला उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरेंचे काही खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात असतानाच ठाकरेंच्या खासदारांच्या या उपस्थितिमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. या चर्चेनंचर उद्धव ठाकरेंनी तात्काळ आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून घेतलं. मात्र, या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

दरम्यान, संजय जाधव यांनी नुकतंच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, ही भेट पुढील वर्षी होणाऱ्या देशातील जनगणना कार्यक्रमात भटके विमुक्त समाज आणि आदिवासी यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याच्या मागणीसाठी घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीही अनेकांना जाधव यांच्या भेटीमागे काही मोठं राजकारण शिजत असल्याचा संशय आहे.

अशातच आता ठाकरेंच्या आणखी दोन खासदारांनी थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डीनर डिप्लोमसीला उपस्थिती लावल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.

खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख हे प्रतापराव जाधव यांच्या डीनर डिप्लोमसीला उपस्थित होते. त्यामुळे आता हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय या डीनर डिप्लोमसीसाठी उपस्थित राहिलेल्या खासदारांचे फोटो समोर आल्याने राज्यात मोठी राजकीय घडामोडी घडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT