Rishikesh Vaidya Case : स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेशी संपर्क साधून अध्यात्माच्या नावाखाली ऋषिकेश वैद्यने महिलेवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.
त्यामुळे आधीच अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असताना वैद्यच्या कारनाम्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता या भोंदू वैद्यचा आणखी एक काळा कारनामा समोर आला आहे.
तो म्हणजे हा नराधम भोंदू वैद्य संबंधित महिलेला सतत अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवायचा या संदर्भातील महिलेच्या मोबाईलमधील अनेक स्क्रीनशॉट आता समोर आले आहेत. याबाबतचे पुरावे पीडितेने पोलिसांकडे दिले आहेत.
या पुराव्यामधील मोबाईलमध्ये या अश्लील स्क्रीनशॉटचा समावेश आहे. त्यामुळे स्वत:ला देवाचा अवतार असल्याचं सांगत धर्माच्या नावाखाली आपल्या वासनेचा नंगानाच करणाऱ्या या आरोपीची विकृत मानसिकता या कृतीतून समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.
पिडितेच्या तक्रारीनुसार, भोंदू वैद्य पीडित महिलेवर मानसिक दबाव टाकत होता. शिवाय तो पीडितेला वारंवार अश्लील मजकूर, फोटो आणि व्हिडिओ पाठवायचा असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या सर्व प्रकारामुळे संबंधित महिला आणखी मानसिक तणावाखाली गेल्याची माहिती समोर आली आहे.
तर पुण्यातील मांजरी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, दुसरीकडे अशा विकृत बाबाचे समर्थन देखील काही लोक करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षता तेंडूलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वच चॅनेल्सवर ऋषिकेश वैद्य गुरुजींबद्दल अपप्रचार सुरू असल्याचे दिसत आहे, असं म्हणत भोंदू वैद्यची पाठराखण केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अशा विकृत बाबांचे समर्थन लोक करत असतील तर समाजातील अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली सुरू असलेले काळे धंदे संपणार कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, ऋषिकेश वैद्यने संबंधित पीडित महिलेला 'मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती' असं सांगत लॉजवर नेलं आणि तिला अमली पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने देखील, मादक पदार्थ देऊन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ऋषिकेश वैद्यने महिलेचे फोटो काढल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून वैद्यला अटक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.