Shivsena UBT Kolhapur: उद्धव ठाकरेंचा नव्या चेहऱ्यांवर विश्वास, शहर प्रमुखपदांची जबाबदारी उमद्या तरुणांवर...

Kolhapur Shivsena UBT Youth Leaders: कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड आज सामनामधून जाहीर करण्यात आली. कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख पदावर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख विशाल देवकुळे, इचलकरंजी शहरप्रमुख शिवाजी संभाजी पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.
Shivsena UBT
Uddhav Thackeray announcing new youth leadership in Kolhapur to strengthen Shiv Sena’s local political strategy.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 02 Apr : नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती अगदी बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेतील अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता.

त्यातून राजीनामा दिलेले उत्तरचे शहर प्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महानगरपालिकेवर स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर कोणाची वर्णी लागणार? या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उत्सुकता होती. अखेर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी उमद्या तरुणांवर सोपवली आहे.

कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड आज सामनामधून जाहीर करण्यात आली. कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख पदावर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख विशाल देवकुळे, इचलकरंजी शहरप्रमुख शिवाजी संभाजी पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.

Shivsena UBT
Gokul Milk Election: गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा 'उकळी' फुटली! एका रात्रीत अधिकाऱ्याची उचलबांगडी

त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील महिला संघटीका यांची देखील नावे जाहीर करण्यात आली. सोलापूर शहर व अक्कलकोटसाठी मीरा नवले, सांगोला व पंढरपूरसाठी स्मिता सावंत, मोहोळ व माढासाठी करुणा घाडगे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख पदी निवड झालेले मंजित माने हे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

Shivsena UBT
Rishikesh Vaidya Case : भोंदू वैद्य बाबाची विकृत मानसिकता उघड; महिलेला अश्लील फोटो अन् व्हिडिओ पाठवल्याचे स्क्रीनशॉट आले समोर...

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कमी जागा आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तर काही पदाधिकाऱ्यांनी विविध समित्यांवर जाण्यासाठी शब्द घेण्यात आले होते. त्यासाठी विशाल देवकुळे यांचे नाव देखील आघाडीवर होते. मात्र त्यांचे नाव ऐनवेळी डावलण्यात आल्यानंतर सुनील मोदी यांना त्यांनी जाब विचारला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com