Maharashtra Assembly Session Sarkarnama
मुंबई

Manipur Incident In Assembly : मणिपूर मुद्यावर काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक; बोलण्याची परवानगी नाकारल्याने विरोधकांचा सभात्याग

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मणिपूरमधील घटनेवर काँग्रेसने आज आक्रमक धोरण स्वीकारले. सभागृह सुरू होताच मणिपूरच्या मुद्यावर बोलण्याची मागणी काँग्रेसकडून विशेषतः महिला आमदारांकडून करण्यात आली. मात्र, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी परवानगी नाकारल्याने विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत विधानसभेत सभात्याग केला. (Opposition walkout from Assembly after being denied permission to speak on Manipur issue)

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात करताच काँग्रेस (Congress) आमदारांनी मणिपूरच्या घटनेवर चर्चेची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी गुटखा आणि तंबाखू विक्रीच्या प्रश्नाला सुरुवात केली. त्याचवेळी काँग्रेसचे आमदार हौदात उतरले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. योग्य आयुधांचा वापर करून आपण प्रस्ताव मांडा, त्यावर आपण चर्चा करू. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, असे ॲड. राहुल नार्वेकर (Adv. Rahul Narwekar) यांनी सांगितले.

हौदात आलेल्या आमदार वर्षा गायकवाड यांना उद्देशून ‘वर्षाताई, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, तुम्ही जागेवर बसा’ असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. तुम्ही जागेवर बसा. मी रुलिंग देतो. तुम्हाला रुलिंग पाहिजे असेल तर तुम्ही जागेवर बसा, असे नार्वेकर वारंवार सांगत होते. मात्र, आमदार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

यशोमती ठाकूर यांनी एक महत्वाचा मुद्दा सभागृहासमोर मांडला. त्या प्रस्तावासंदर्भातील कोणतीही सूचना तुम्ही मला दिलेली नाही. दालनातही दिलेले नाही, त्यामुळे नियमांचे पालन करून योग्य आयुधांतून तुम्ही ही चर्चा मागा. त्यासंदर्भातील योग्य तो निर्णय आपण त्यावेळी घेऊ. आता नियमानुसार काम चालू द्यावे. तुम्ही सर्वजण ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्हा सभागृहात व्यत्यय आणण्याचा अधिकार नाही. कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही सभागृहात व्यत्यय आणू शकत नाही. तुम्ही सभागृहात येऊन गोंधळ घालू शकत नाही, असे अध्यक्षांनी विरोधकांना सुनावले.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावल्यानंतरही विरोधकांचा मणिपूरच्या मुद्यावर चर्चेचा आग्रह कायम होता. मात्र, नार्वेकर हे प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आपण त्यावर निर्णय घेऊ असे सांगत होते. त्यानंतर काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक होत्या. त्या चर्चेवर ठाम होत्या.

गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना नार्वेकर म्हणाले की, प्रश्नोत्तरांचा तास संपू द्या. तुम्हाला रुलिंग ऐकायचे आहे की नुसता गोंधळ घालायचा आहे. तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण मुद्या मांडलेला आहे. या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. पण, एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणायची असेल तर योग्य आयुधांचा वापर करावा. त्यावर आपण योग्य निर्णय करू. पण, सभागृहात येऊन तुम्हाला पाहिजे तशी चर्चा घडवून घेणे, हे चालणार नाही. तुम्ही सर्वजण ज्येष्ठ सदस्य आहात. हे तुमच्याकडून अपेक्षित नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT